Thursday, May 2, 2024
Homeमुख्य बातम्याBuldhana Bus Accident : बुलढाण्यातील अपघाताने तरी सरकारचे डोळे उघडावेत, उद्धव ठाकरेंनी...

Buldhana Bus Accident : बुलढाण्यातील अपघाताने तरी सरकारचे डोळे उघडावेत, उद्धव ठाकरेंनी सुनावलं

मुंबई | Mumbai

नागपूरहून पुण्याकडे जाणाऱ्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसचा (Vidarbha Travels Bus) समृद्धी महामार्गावरील (Samriddhi Highway) बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील सिंदखेडराजा जवळ पिंपळखुटा येथे भीषण अपघात झाला. अपघातानंतर बस पलटी झाली, यावेळी प्रवासी बसच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असताना बसने पेट घेतला आणि २६ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे, तर ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातावर विविध राजकीय पक्षातील नेत्यांनी शोक व्यक्त केली आहे. शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

- Advertisement -

“बुलढाणा येथे समृद्धी महामार्गावर एका बसला भीषण अपघात होऊन त्यात २६ जणांचा दुर्दैवी अंत झाला. हे वृत मन हेलावणारे आहे. गेल्या वर्ष भरात या महामार्गावर असे अपघात सुरूच आहेत. आतापर्यंत ३०० हून जास्त प्रवासी त्यात मरण पावले. सरकारने अपघात टाळण्यासाठी काहीच उपाय योजना केल्या नाहीत. बुलढाण्यातील अपघाताने तरी सरकारचे डोळे उघडावेत. अपघातात जीव गमावलेल्या अभागी जीवांना मी श्रद्धांजली अर्पण करीत आहे,” असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Buldhana Bus Accident : बसचा केवळ सांगाडा उरला, प्रवाशांचा झाला कोळसा… मृतांची ओळख पटवणार कशी?

युवासेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनीसुद्धा अपघाताची माहिती मिळाल्यावर ट्विट केलं आहे. नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या खासगी बसला बुलढाणा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात २५ प्रवाशांचा आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सुन्न करणारी आहे. मृत प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली. ॐ शांती ???????? , समृद्धी महामार्गावर वाढते अपघात रोखण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या