Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशब्रिटनमध्ये परिस्थिती गंभीर; पुन्हा कडक लॉकडाऊन

ब्रिटनमध्ये परिस्थिती गंभीर; पुन्हा कडक लॉकडाऊन

दिल्ली । Delhi

करोनाच्या नव्या प्रकाराने ब्रिटनमध्ये थैमान घातलं आहे. त्या पार्श्वभूमीवर ब्रिटनमध्ये पुन्हा एखदा लॉकडाऊनची घोषणा पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी केली आहे. जॉन्सन यांनी देशवासियांना संबोधित केलं. त्यावेळी हा लॉकडाऊन बुधवारपासून लागू होईल अशी घोषणा केली आहे.

- Advertisement -

करोनाच्या नव्या प्रकाराला रोखण्यासाठी हा लॉकडाउन लागू केला जात असल्याचं त्यांनी सांगितलं असून याची सुरुवात शाळांपासून होणार आहे. बुधवारपासून सर्व शाळा बंद होतील अशी माहिती त्यांनी जनतेला संबोधित करताना दिली. स्कॉटलंडकडून करण्यात आलेल्या घोषणेनंतर बेरिस जॉन्सन यांनी ही घोषणा केली.

ब्रिटनमध्ये लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर जॉन्सन यांनी नागरिकांना काहीसा दिलासाही देऊ केला आहे. अतंत्य गरजेच्या कामासाठी नागरिकांना घराबाहेर पडण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यात गरजेचं काम, कार्यालयात जाण्यासाठी, वर्क फ्रॉम होम करु शकत नसाल तर, व्यायाम, मेडिकल आणि कौटुंबिक हिंसेपासून वाचण्यासाठी तुम्ही घराबाहेर पडू शकता, असंही जॉन्सन यांनी स्पष्ट केलं आहे.

ब्रिटनमध्ये मृत्यूदर जास्त असल्या कारणाने आधीच जवळपास चार कोटी जनतेला कडक निर्बंधांमध्ये रहावं लागत आहे. ब्रिटन करोनाला आळा घालण्यात अपयशी ठरलं असून करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यासाठी करोनाच्या नव्या प्रकाराला जबाबदार ठरवण्यात आलं आहे.

बेरिस जॉन्सन यांनी सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, करोनाची लागण झालेले जवळपास २७ हजार लोक रुग्णालयात दाखल असून एप्रिलच्या पहिल्या महिन्यात करोनाची पहिली लाट आली होती त्याच्या तुलनेत ४० टक्के जास्त आहे. गेल्या मंगळवारी फक्त २४ तासांत ८० हजार लोक करोना पॉझिटिव्ह आढळले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या