Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशRussia-Ukrain War : युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला ; रशियाने हवाई वाहतूक केली...

Russia-Ukrain War : युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला ; रशियाने हवाई वाहतूक केली बंद

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध (Russia And Ukrain War) संपण्याचे नाव घेत नाहीए. दरम्यान, युक्रेनच्या एका ड्रोनने रशियात घुसून हल्ला केल्याचे वृत्त आहे. हे ड्रोन रशियाची राजधानी मॉस्को (Drone Attack In Moscow) येथे पोहोचले आणि तेथील दोन इमारतींवर हल्ला केला. युक्रेनी सैन्याचे ड्रोनने मॉस्कोतील २ इमारतींना टार्गेट केले. या हल्ल्यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. रात्रीच्या वेळी अचानक झालेल्या या हल्ल्याने इमारतींचे मोठे नुकसान झाले पण कुणीही जखमी नाही अशी माहिती मॉस्कोचे मेयर यांनी दिली.

- Advertisement -

युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यानंतर मॉस्कोमध्ये हवाई वाहतूक सध्या बंद करण्यात आली आहे. मॉस्कोमध्ये युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यानंतर रशियन लष्करानेही जोरदार प्रत्युत्तर देत अनेक ड्रोन उद्ध्वस्त केले आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान टळले. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात येत आहे.

“आनंद दिघे निष्ठावंत शिवसैनिक, त्यांचं नाव…”; संजय राऊतांचा शिंदे गटावर हल्लाबोल

शुक्रवारी रशियाने म्हटले की, यूक्रेन सीमेजवळील दक्षिणी रोस्तोव क्षेत्रात २ युक्रेनी मिसाईल रोखल्या. ज्यात तगानरोग शहरात ढिगारा कोसळल्याने १६ लोक जखमी झालेत. मागील वर्षी फेब्रुवारीत मॉस्कोकडून केलेल्या सैन्य कारवाईला उत्तर म्हणून युक्रेन सीमेलगत परिसरात वारंवार ड्रोन हल्ले आणि गोळीबारी होत असल्याचे दिसून येते.

दरम्यान, याआधी नुकतेच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे युक्रेनसोबतच्या युद्धाबाबत शांतता प्रस्तावाबाबत विधान आले होते. रशियाने युक्रेनशी चर्चा करण्याची शक्यता नाकारली नसल्याचे पुतीन म्हणाले होते. रशिया-युक्रेन युद्धाबाबत राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची भूमिका थोडी नरम झाल्याचे सांगण्यात येत आहे. युक्रेनवरील कारवाई अधिक तीव्र केली जाणार नसल्याचे पुतीन यांनी सांगितले.

संभाजी भिडेंच्या महात्मा गांधींसबंधींच्या वक्तव्याचा देवेंद्र फडणवीसांकडून निषेध; म्हणाले…

काही दिवसांपूर्वीही युक्रेनने रशियातील ताब्यात असलेल्या माकिव्का शहरावर हल्ला केला. रात्री केलेल्या या हल्ल्यात युक्रेनी सैन्याने अमेरिकेकडून मिळालेल्या हिमरास रॉकेट्सचा वापर केला होता. युक्रेन सैन्याने २ रॉकेट टार्गेट करत तेल डेपोवर डागले होते. रॉकेट्समुळे पहिला स्फोट छोटा झाला. परंतु हळूहळू स्फोट मोठा झाला.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

दरम्यान, रशियाने नाटोला मोठी धमकी दिल्याचेही वृत्त आहे. अन्नधान्याचा पुरवठा बंद करण्याची ही धमकी आहे. धान्य पुरवठा रशिया वॅगनर ग्रुपला पाठवू शकतो. रशियाने रोमानियामध्ये ड्रोन हल्ला केला ज्यामध्ये धान्य गोदामांना लक्ष्य करण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या