Thursday, May 2, 2024
Homeक्रीडाउमर गुलचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा

उमर गुलचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा

कराची – Karachi

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज उमर गुलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे. तो पुढील करिअर कोचिंगमध्ये करण्यासाठी इच्छुक आहे.

- Advertisement -

गुलने पाकिस्तानकडून ४७ कसोटी, १३० एकदिवसीय तर ६० टी-२० सामने खेळली आहेत. पाकिस्तान संघाने २००९मध्ये टी-२० विश्वकरंडक जिंकला होता. पाकच्या या विजयात गुलने मोलाचे योगदान होते.

उमर गुलने २००३ ते २०१६ या काळात पाकिस्तानचे प्रतिनिधीत्व केले. गुलने कसोटीत १६३, एकदिवसीयमध्ये १७९ तर टी-२० मध्ये ८५ गडी बाद केले आहेत. याशिवाय गुल आयपीएलमध्ये सौरव गांगुलीच्या नेतृत्वात कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला आहे.

उमर गुलने कसोटीचा शेवटचा सामना २०१३मध्ये खेळला होता. याशिवाय तो एकदिवसीय आणि टी-२० मध्ये अखेरचा सामना २०१६ मध्ये खेळला. गुलने क्रिकेटच्या तिनही प्रकारात ४०० हून अधिक गडी बाद केले आहेत.

मुल्तान आणि रावलपिंडी येथे ३० सप्टेंबरपासून नॅशनल टी-२० विश्वकप खेळला जाणार आहे. या स्पर्धेत उमर गुल बलुचिस्तान ङ्गर्स्ट इलेव्हनचा सदस्य आहे. याशिवाय तो संघाचा मेंटर ही आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या