Friday, May 3, 2024
Homeनगरविनाअनुदानित शाळेतील शिक्षकांमध्ये प्रचंड रोष

विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांमध्ये प्रचंड रोष

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

खासगी विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांची बदली अनुदानित शाळा किंवा तुकडीवर करण्याच्या निर्णयाला स्थगिती दिल्यामुळे शिक्षकांमध्ये शासनाविरुद्ध रोष निर्माण झाला आहे. ही स्थगिती तत्काळ रद्द करावी, अशी मागणी शिक्षक भारती संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.

- Advertisement -

शिक्षक आ. कपील पाटील व राज्याध्यक्ष अशोक बेलसरे यांनी शिक्षणमंत्री दीपक केसरकर व शिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव रणजितसिंह देओल यांच्या निदर्शनास आणून दिले, 28 जून 2016 व 1 एप्रिल 2021 च्या शासन निर्णयानुसार खासगी शाळेतील विनाअनुदानीतवरून अंशतः अनुदानित किंवा पूर्णतः अनुदानित शाळा किंवा तुकडीवर शिक्षकांची बदली करण्याची तरतूद केली होती.

मात्र, शिक्षक भरती बंदीत विनाअनुदानीतवरून अनुदानीतवर बदली केल्याचा ठपका ठेवत शालेय शिक्षण विभागाने 1 डिसेंबर 2022 रोजी एका परिपत्रकाद्वारे या चांगल्या निर्णयाला स्थगिती दिली. शिक्षक भरती बंदीच्या कालावधीत नव्याने नियुक्ती देऊ नये, असा नियम आहे; परंतु जे शिक्षक पूर्वीच कार्यरत होते, त्यांची विनाअनुदानीतवरून अनुदानीतवर फक्त बदली करण्यात आलेली आहे.

नव्याने पदभरती केलेली नाही. तेव्हा स्थगीतीचा निर्णय तात्काळ रद्द करावा, अशी मागणी शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप,आशा मगर, बाबासाहेब लोंढे, विजय कराळे, रामराव काळे, सचिव महेश पाडेकर, मोहंमद समी शेख, योगेश हराळे, संभाजी पवार, संजय भुसारी, हनुमंत रायकर, नवनाथ घोरपडे, सुदाम दिघे, संजय पवार, संतोष देशमुख, किसन सोनवणे, संजय तमनर, कैलास जाधव, संतोष शेंदुरकर, संजय भुसारी, सिकंदर शेख, रेवण घंगाळे, विलास गाडगे आदींनी मागणी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या