Friday, May 17, 2024
Homeक्रीडाराज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी पंधरा वर्षाखालील मुलींची निवड चाचणी

राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी पंधरा वर्षाखालील मुलींची निवड चाचणी

जळगाव – प्रतिनिधी jalgaon

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे (Maharashtra Cricket Association) आगामी काळात होणाऱ्या पंधरा वर्षाखालील मुलींच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेकरिता (State level cricket tournament) जळगाव जिल्हा (Jalgaon District) मुलींच्या १५ वर्षाखालील संघाची निवड चाचणी रविवार, दि.१६ ऑक्टोबरला जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे जैन स्पोर्ट्स अकॅडमी (Jain Sports Academy) क्रिकेट ग्राउंड, विद्या इंग्लिश स्कूलच्या मागे, जळगाव येथे ठेवण्यात आलेली आहे.

- Advertisement -

ज्या मुलींचा जन्म 1 सप्टेंबर 2007 ते 31 ऑगस्ट 2009 या दरम्यान झालेला असेल अशाच मुली निवड चाचणी करिता पात्र ठरतील. तरी सर्व इच्छुक खेळाडूंनी आपल्या जन्मतारखेच्या दाखल्यासह, क्रिकेटच्या पांढऱ्या गणवेशात व स्पोर्ट शूज घालून रविवार, १६ ऑक्टोबर ला दुपारी 4 वाजता मैदानावर उपस्थित राहावे असे आवाहन जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन (Jalgaon District Cricket Association President Atul Jain), सचिव अरविंद देशपांडे (९४२२२७८९३६) व सहसचिव अविनाश लाठी (९८२२६१६५०३) यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या