Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रबांधकामग्रस्त इमारतीचा स्लॅब कोसळला, ५ जणांचा मृत्यू

बांधकामग्रस्त इमारतीचा स्लॅब कोसळला, ५ जणांचा मृत्यू

पुणे | Pune

पुण्यातील येरवडा परिसरातील शास्त्रीनगर भागात बांधकाम सुरु असलेल्या इमारतीचा स्लॅब (Pune Building Slab Collapse) कोसळून पाच कामगारांचा (Labors Death) जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रात्री साडेदहा ते सव्वा अकराच्या दरम्यान ही घटना घडली.

- Advertisement -

रेणुका माता देवी मंदिरातील दानपेटी गॅस कटरने फोडली

पुण्यातील शास्त्रीनगर चौक, वाडिया बंगला गेट नंबर ८ (Yerwada Shastri Nagar area of Pune) येथील नवीन इमारतीसाठी तळमजल्यावर लोखंडी सांगाडा बांधण्याचे काम सुरु होते. रात्री साडेदहा ते सव्वा अकराच्या हा स्लॅब अचानक कोसळला. त्याखाली तेथे काम करीत असलेल्या जवळपास १० कामगार खाली दबले गेले.

अग्निशामक दलाला या घटनेची माहिती रात्री ११ वाजून १४ मिनिटांनी मिळाली. त्याबरोबर अग्निशामक दलाच्या ५ गाड्या, रुग्णवाहिका, १०८ च्या १० रुग्णवाहिका, पोलीस घटनास्थळी पोहचले. हा लोखंडी सांगाडा इतका मोठा होता की त्याखाली दबलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांनी इलेक्ट्रीक करवतीचा वापर करुन हा सांगाडा कापला व त्यानंतर खाली अडकलेल्या कामगारांना बाहेर काढले.

साखर कारखान्याच्या माजी संचालकाच्या घरावर धाडसी दरोडा

या दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान कार्यालयाने केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, पुण्यातील इमारत कोसळल्याच्या दुर्घटनेमुळे दु:ख झालं. या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या लोकांच्या कुटुंबियांप्रती शोकसंवेदना. आशा आहे की यात जखमी झालेले लवकरात लवकर बरे होतील.

दरम्यान या प्रकरणात आता पोलिसांनी तत्काळ सूत्र हालवत बांधकाम व्यवसायिक, कंत्राटदार, पर्यवेक्षक, सुरक्षा अभियंता आणि बांधकाम साइटशी संबंधित काही जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये भारतीय दंड संहितेच्या कलम ३०४, ३३६, ३३७ अंतर्गत गुन्ह्याची नोंद झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या