Sunday, May 19, 2024
Homeनाशिकरेल्वे व्यवस्थापकाकडून अंडरपास पाहणी

रेल्वे व्यवस्थापकाकडून अंडरपास पाहणी

नांदगाव । प्रतिनिधी Nandgaon

मुसळधार पावसामुळे तुडूंब भरलेल्या अंडरपाससह (Underpass) रेल्वेस्टेशनची पाहणी (Inspection of railway station) करत भुसावळचे (Bhusaval) विभागीय रेल्वे व्यवस्थापक एस. एस. केडिया (Divisional Railway Manager S. S. Kedia) यांनी नुकसानीचा आढावा घेतला. रेल्वे व्यवस्थापकांनी अंडरपासची अचानक पाहणी केल्याने रेल्वे प्रशासन यंत्रणेची (Railway administration system) एकच धावपळ उडाली होती.

- Advertisement -

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Union Minister of State for Health Dr. Bharti Pawar) यांनी नांदगावी भेट देत नुकसानीची पाहणी केली. डॉ. पवार यांनी पाण्याने तुडूंब भरलेल्या अंडरपासची देखील पाहणी केली होती.

अंडरपास बंद झाले असतांना देखील रेल्वेचा (Railways) एकही अधिकारी पाहणीसाठी फिरकला नसल्याची तक्रार ना.डॉ. पवार यांच्याकडे केली असता त्यांनी त्वरीत भ्रमणध्वनीव्दारे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना या संदर्भात सुचना केली असता तातडीने भुसावळचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक एस. एस. केडिया यांनी मनमाड रेल्वे स्थानकाची (Manmad railway station) पाहणी केल्यानंतर नांदगावी येत अंडरपास पाहणी केली.

स्थानिक रेल्वे प्रशासनाला यासंदर्भात माहिती नव्हती. अंडरपासची पाहणी करून अंडरपास मधील साचलेल्या पाण्यासंदर्भात त्यांनी स्थानिक रेल्वे प्रशासनाला सुचना केल्या. अंडरपासमध्ये महापुराचे साचल्याने शहरात ये-जा करण्यासाठी रस्ता पुर्णपणे बंद झाल्याने पायी चालणार्‍या नागरिकांना वळसा मारत जुन्या लेंडीनदीच्या पुलाखालून व रेल्वे रुळावरून जीव धोक्यात घालून जावे लागत आहे तर दुचाकी चारचाकी वाहनधारकांना उडाणपुल मार्गे 2 किलोमीटर अंतराने शहरात प्रवेश करावा लागत आहे.

अंडरपासमध्ये पाणी साचून नांदगाव शहराच्या (Nandgaon City) अडचणीत भर पडलेली आहे अंडरपास मुळे नांदगाव शहराचे दोन भाग पडले. दोन्ही भागांचा एकमेकांशी संपर्क तुटला आहे. शहरासह ग्रामीण भागातील हजारो नागरिक, शाळकरी मुले मोठ्या प्रमाणावर अंडरपास मार्गे ये-जा करतात. मात्र पाण्यामुळे हा मार्ग तुडूंब भरला असल्याने नागरीकांना मानिसक त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येकडे मध्य रेल्वे प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याची अपेक्षा शहरवासियांतर्फे व्यक्त केली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या