Friday, May 3, 2024
Homeधुळेमोहाडीतील विहीरीत अनोळखी मृतदेह आढळला

मोहाडीतील विहीरीत अनोळखी मृतदेह आढळला

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

शहरातील मोहाडी उपनगरातील परमार लॉन्सजवळील विहिरीत आज एका अनोळखी मृतदेह आढळून आला.

- Advertisement -

याबाबत मोहाडी पोलिसात नोंद झाली असून मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

परमान लॉन्सजवळील एका विहिरीत सकाळी एका इसमाचा मृतदेह आढळून आला. त्याचे वय अंदाजे 35 वर्ष आहे.

पोलिसांनी खाटेच्या सहाय्याने विहिरीतू मृतदेह बाहेर काढला. त्याला उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

इसमाची अद्याप ओळख पटलेली नाही. याबाबत मोहाडी पोलिसात प्रथमदर्शी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या