Friday, May 3, 2024
Homeनंदुरबारअज्ञात माथेफिरुने शेतात लावली आग

अज्ञात माथेफिरुने शेतात लावली आग

बोरद – Borad – वार्ताहर :

तळोदा-अक्कलकुवा रस्त्यावर अज्ञात माथेफिरुने ऊसाच्या पिकांना आग लावल्याने 2 हेक्टरवरील

- Advertisement -

ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली. यात सुमारे अडीच लाखांचे नुकसान झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तळोदा शिवारातील अक्कलकुवा रस्त्या लगत असलेल्या शेती गट क्रमांक 221/04 मधील 1.86 हेक्टरवरील असलेल्या ऊसाच्या पिकाला अज्ञात माथेफिरूने आग लावली.

यात 2 लाख 50 हजाराचा ऊस जळून खाक झाला. सदर घटनेची माहिती गजू रामदास धेडगे यांनी तळोदा पोलीस ठाण्यात दिली.

त्यानुसार त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात इसमाविरुद्ध अग्नी उपद्रवचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तात्काळ नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी यांच्याकडून करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या