Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशUnion Budget 2023 for Education Sector : आजच्या अर्थसंकल्पातुन शिक्षण क्षेत्राला काय...

Union Budget 2023 for Education Sector : आजच्या अर्थसंकल्पातुन शिक्षण क्षेत्राला काय मिळाले?

दिल्ली | Delhi

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सर्वसाधारण अर्थसंकल्प (Union Budget 2023) सादर केला. या अर्थसंकल्पात केंद्र सरकारकडून अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये टॅक्स स्लॅबमध्ये कपात ही सर्वात मोठी घोषणा आहे.

- Advertisement -

याचबरोबर सरकारने जुनी करप्रणाली रद्द केली. याबरोबर अर्थसंकल्पात शिक्षणावरही (Education Sector) भर देण्यात आला आहे. पुढच्या ३ वर्षांत केंद्राकडून ३८,८०० शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची एकलव्य मॉडेल निवासी शाळांसाठी भरती करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे. या शाळांमधून शिक्षण घेणाऱ्या साडेतीन लाख विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले. तसेच शिक्षकांसाठी प्रशिक्षणासाठी वेगवेगळ्या योजना राबवण्यात येणार आहे. तसेच वैद्यकीय शिक्षणासाठी 157 नवीन महाविद्यालये बांधण्यात येणार आहे.

कोरोनामुळे लाखो मुलांचे नुकसान झाले आहे. विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रंथालयाची निर्मिती करण्यात येणार आहे. दुर्मीळ आणि चांगल्या पुस्तकांसाठी राजधानी दिल्लीत राष्ट्रीय डिजिटल ग्रंथालयाची (National Digital Library) निर्मिती करण्याचा केंद्र सरकारचा संकल्प आहे. तसंच राज्य सरकारांनी पंचायत स्तरावर तसेच वॉर्ड स्तरावर छोटी ग्रंथालये उभारावीत यासाठी प्रोत्सहन दिलं जाण्याचा प्रस्ताव आहे. तसंच राष्ट्रीय स्तरावर सुरु होणाऱ्या डिजिटल ग्रंथालयाचा लाभ घेण्यासाठी आवश्यक सुविधा ग्रामपंचायत तसंच वॉर्ड स्तरावर सुरु करावेत यासाठीही योग्य ती मदत पुरवण्याचा केंद्राचा मानस आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या