Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशकेंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार : 15 कॅबिनेट, 28 राज्यमंत्र्यांना शपथ

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार : 15 कॅबिनेट, 28 राज्यमंत्र्यांना शपथ

नवी दिल्ली / New Delhi – पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळाचा विस्तार आज झाला. राष्ट्रपती भवनात 43 मंत्र्यांचा शपथविधी झाला. यात महाराष्ट्रातील 4 नेत्यांचा समावेश आहे. नारायण राणे यांना कॅबिनेट तर कपिल पाटील, भारती पवार आणि भागवत कराड यांना राज्यमंत्री पद मिळालं आहे. अद्याप खातेवाट जाहीर झालेलं नाही. पण नारायण राणेंना केंद्र सरकारने नवीनच स्थापन केलेल्या सहकार मंत्रालयाची जबाबदारी दिली जाईल, अशी चर्चा आहे. मंत्रिमंडळात 36 नव्या चेहर्‍यांना मंत्रिमंडळात संधी देण्यात आली आहे. तर 7 विद्यमान मंत्र्यांना पुन्हा संधी दिली गेली आहे.

15 कॅबिनेट मंत्री

- Advertisement -

1. नारायण राणे

2. सर्वानंद सोनोवाल

3. विरेंद्र कुमार

4. ज्योतिरादित्य शिंदे

5. रामचंद्र प्रसाद सिंह

6. अश्‍विनी वैष्णव

7. पशुपती कुमार पारस

8. किरेन रिजीजू

9. राजकुमार सिंह

10. हरदीप सिंग पुरी

11. मुकेश मांडवीय

12. भुपेंद्र यादव

13. पुरुषोत्तम रुपाला

14. जी. किशन रेड्डी

15. अनुराग सिंह ठाकूर

28 राज्यमंत्री

1. पंकज चौधरी

2. अनुप्रिया सिंह पटेल

3. सत्यपाल सिंह बघेल

4. राजीव चंद्रशेखर

5. शोभा करंदजले

6. भानु प्रताप सिंह वर्मा

7. दर्शना विक्रम जरदोश

8. मिनाक्षी लेखी

9. अन्नपूर्णा देवी

10. ए. नारायणस्वामी

11. कुशाल किशोर

12. अजय भट्ट

13. बी. एल. वर्मा

14. अजय कुमार

15. चौहान देवुसिन्ह

16. भगवंत खुबा

17. कपिल मोरेश्‍वर पाटील

18. प्रतिमा भौमिक

19. सुभाष सरकार

20. भागवत किशनराव कराड

21. राजकुमार रंजन सिंह

22. भारती प्रवीण पवार

23. बिश्‍वेश्‍वर तुडू

24. शंतनू ठाकूर

25. मंजुपारा महेंद्रभाई

26. जॉन बारला

27. मुरूगन

28. निसिथ प्रामाणिक

- Advertisment -

ताज्या बातम्या