Thursday, May 2, 2024
Homeमुख्य बातम्याकेंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुण्यात

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुण्यात

पुणे । प्रतिनिधी Pune

सहकार खात्याकडून लॉन्च करण्यात आलेल्या एका पोर्टलचे उद्घाटन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्या करण्यात येणार आहे.

- Advertisement -

दरम्यान,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठोपाठ अमित शहा पुण्याच्या दौर्‍यावर येत असल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मल्टिस्टेट सहकारी पतसंस्थांच्या पोर्टलचं उद्घाटन केल्यानंत अमित शाह राज्यातील प्रमुख नेत्यांसोबत बैठकीत चर्चा करणार आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

सहकारमंत्री अमित शहा यांच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीप वळसे पाटील, स्थानिक आमदार महेश लांडगे आणि हर्षवर्धन पाटील उपस्थित राहणार आहेत. गृहमंत्री अमित शहा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीबाबत रणनीती ठरवली जाणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या