Tuesday, March 25, 2025
HomeनाशिकNashik News : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 'या' तारखेला त्र्यंबकेश्वर दौऱ्यावर

Nashik News : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ‘या’ तारखेला त्र्यंबकेश्वर दौऱ्यावर

त्र्यंबकेश्वर | वार्ताहर | Trimbakeshwar

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) शुक्रवार (दि.२४) रोजी त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथे दर्शनासाठी येणार आहेत. यावेळी ते त्र्यंबकराज मंदिरात दर्शन घेणार असून १२.३० ते १२.५५ ही वेळ त्यांच्या त्र्यंबकेश्वर दौऱ्यासाठी आरक्षित करण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तिनाथ यात्रेच्या कालावधीत शहांचा हा दौरा होणार असल्याने त्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

- Advertisement -

त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तिनाथ महाराजांची यात्रा (Saint Nivrittinath Maharaj Yatra) शनिवार (दि.२५) रोजी आहे. पंरतु, या यात्रेच्या आदल्या दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी येणार असल्याने त्यांच्या दर्शनाचे नियोजन जिल्हा प्रशासन कसे करणार याकडे नागरिकांचे व भाविकांचे लक्ष लागले आहे. मध्यंतरी नाशिकमध्ये (Nashik) अमित शहा आले असता त्र्यंबकेश्वरला येणार होते, पंरतु काही कारणास्तव ते येऊ शकले नव्हते. त्यानंतर आता यात्रा काळात शहा त्र्यंबकेश्वरची वारी करणार आहेत.

दरम्यान, संत निवृत्तिनाथ महाराज यात्रेच्या दिवशी द्वादशी एकादशी असल्याने त्या दिवशी मोठ्या प्रमाणावर दिंड्या त्र्यंबकेश्वरमध्ये (Trimbakeshwar) दाखल होणार आहेत. यावेळी त्र्यंबकरोडसह मंदिराचा परिसर व संत निवृत्तीनाथ महाराज मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री अमित शहांच्या त्र्यंबकेश्वर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन कसे नियोजन करते? हे बघणे महत्त्वाचे असणार आहे.

याआधी २०१५ साली शहा आले होते त्र्यंबकेश्वर दौऱ्यावर

२०१५ च्या कुंभमेळ्यात (Kumbh Mela) देखील अमित शहा त्र्यंबकेश्वर येथे आले होते. त्यावेळी त्यांनी त्र्यंबकेश्वरच्या नील पर्वतावर आखाडा परिषदेचे महामंत्री हरी गिरीजी महाराज यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता तब्बल दहा वर्षांनी शहा त्र्यंबकेश्वर दौऱ्यावर येत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...