Friday, May 3, 2024
Homeनगरअर्थ खात्याकडून ग्रामीण भागासाठी सहा हजार कोटी - मंत्री कराड

अर्थ खात्याकडून ग्रामीण भागासाठी सहा हजार कोटी – मंत्री कराड

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली गेल्या आठ वर्षात भ्रष्टाचार विरहित कारभार चालू आहे. या काळात देशाने सर्वच क्षेत्रात प्रगती करत जगात विकासाच्या बाबतीत पाचवा क्रमांक मिळवला आहे.मी गरीब कुटुंबातून आलो असल्याने मला ग्रामीण भागाची जाण आहे. राज्यात व देशात आता आपली सत्ता असून आपली जी अडीच वर्षे वाया गेली आहेत त्याची आता कसर भरून काढायची आहे. आपल्या केंद्रीय अर्थ खात्यामार्फत विविध विकास योजनांसाठी सहा हजार कोटी रुपयांचा निधी दिला जाणार असून या निधीतून ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळणार आहे, असेे प्रतिपादन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी केले.

- Advertisement -

पाथर्डी तालुक्याच्या दौर्‍यावर आले असता आमदार मोनिका राजळे यांच्या कार्यालयात आयोजित सत्कार समारंभ प्रसंगी कराड बोलत होते. आमदार मोनिका राजळे यांच्यासह अंजली कराड, भाजप जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, माणिक खेडकर, गोकुळ दौंड, राहुल राजळे, विष्णुपंत अकोलकर, अशोक गर्जे, अभय आव्हाड, डॉ. मृत्युंजय गर्जे, नंदकुमार शेळके, बजरंग घोडके, संजय बडे, काका शिंदे, शिवाजी मोहिते, बंडू बोरुडे, प्रमोद भांडकर, अजय भंडारी, डॉ. रमेश हंडाळ, सचिन वायकर, संजय वैद्य, दीपक बडे, मंगल कोकाटे, सिंधू साठे, जमीर आतार हे उपस्थित होते.

या वेळी बोलताना ना.कराड म्हणाले की, देशाचा कारभार पाहणार्‍या सत्याहत्तर केंद्रीय मंत्र्यांमध्ये माझा समावेश करून पंतप्रधान मोदी यांनी माझ्यावर मोठा विश्वास टाकला आहे. यासह खासदार तसेच आमदार, भाजपच्या पदाधिकार्‍यांवर दाखवण्यात आलेला विश्वास आपण सार्थ ठरवूया, असे आवाहन त्यांनी केले.

सासुरवाडीला त्रास देणार नाही

यावेळी कराड म्हणाले , पाथर्डी तालुका ही माझी सासुरवाडी आहे, त्यामुळे मी सासुरवाडीला त्रास देणार नाही. माझी पत्नी पाथर्डीची कन्या आहे. तर या मतदारसंघाच्या भाजपाच्या आमदार राजळे ह्या औरंगाबादच्या कन्या आहेत. त्यामुळे तुम्ही मागणी करा मी पाहिजे तेवढा निधी देईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या