Sunday, May 5, 2024
Homeदेश विदेशकेंद्रीय राज्यमंत्र्यांच्या घरात हत्याकांड; मुलाच्या बंदुकीतून झाडली गोळी

केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या घरात हत्याकांड; मुलाच्या बंदुकीतून झाडली गोळी

उत्तर प्रदेश | Uttar Pradesh

केंद्रीय राज्यमंत्री आणि उत्तर प्रदेशच्या मोहनलाल गंज मतदारसंघातील (MohanlalGanj) खासदार कौशल किशोर (Kaushal Kishor) यांच्या निवासस्थानी एका तरुणाची हत्या(Youth Shot Dead) करण्यात आली आहे. लखनऊ (Lucknow) येथील त्यांच्या निवासस्थानी तरुणाची हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

विनय श्रीवास्तव असे मृताचे नाव असून किशोर यांच्या मुलाचा विनय हा मित्र होता आणि त्याच्यासोबतच राहत होता. पोलिसांनी परवानाधारक पिस्तूल ताब्यात घेतले असून शव ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली आहे.

Manipur Violence : मणिपूरमधील हिंसाचार थांबेना! दोन दिवसांमध्ये ५ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी

मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय राज्यमंत्री कौशल किशोर यांच्या ठाकूरगंज पोलीस ठाणे क्षेत्रातील बेगरिया गावातील निवासस्थानी ही घटना घडली. येथेच विनय श्रीवास्तव याची गोळी घालून हत्या करण्यात आली. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी तिघांना ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी केली जात आहे.

दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु केली आहे. विनयच्या कुटुंबीयांनी हत्येचा आरोप करत पोलिसांत एफआयआरची नोंद केली आहे. विनयच्या मृतदेहावर डोक्यावर जखमा आढळल्या आहेत. घरामध्ये रात्री सहा जण आले होते, तिथे त्यांनी पार्टी केल्याचेही समोर आले आहे. यानंतर विनयवर गोळी झाडण्यात आली आहे. ज्या पिस्तुलमधून गोळी झाडली ते किशोर यांच्या मुलाचे परवाना असलेले पिस्तुल होते, असे डीसीपी यांनी सांगितले.

Aditya L-1: सूर्य मोहीमेच काऊंटडाऊन सुरु

या प्रकरणी कौशल यांनी सांगितले की, मला घटनेची माहिती मिळाली आहे. पोलीस आयुक्तांना फोन करुन यासंबंधी सांगण्यात आले असून पोलीस तपास करत आहेत. आम्ही पीडित कुटुंबासह आहोत. पोलीस आपले काम करतील. माझा मुलगा घटना घडली तेव्हा घटनास्थळी उपस्थित नव्हता. पिस्तूल सापडली असून, जप्त करण्यात आली आहे. पोलीस तपास करत आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या