Sunday, September 8, 2024
Homeनाशिकमतदार संघाच्या विकासासाठी बांधील : डॉ. पवार

मतदार संघाच्या विकासासाठी बांधील : डॉ. पवार

वणी | प्रतिनिधी

दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या विकासासाठी बांधील असुन वणी व परीसरात कोट्यावधी रुपयांची कामे सुरु आहेत. प्रलंबित कामांची पुर्तता करुन घेण्यासाठी मागणी व पाठपुरावा करुन त्याच्या पुर्तीसाठी प्रयत्नशील राहवे, असे आवाहन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले.

- Advertisement -

वणी ग्रामपालीकेला सदिच्छा भेट प्रसंगी त्या बोलत होत्या. वणी – नाशिक रस्ता महामार्ग करावा, जगदंबा देवी मंदिराच्या विकासासाठी निधी द्यावा, शहारातील अंतर्गत रस्त्यांबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहासाठी निधीची मागणी व इतर विकास कामांसाठीची मागणी यावेळी करण्यात आली.

वणी ग्रामपालिकेकडुन सरपंच मधुकर भरसठ, उपसरपंच विलास कड, ग्रा. प. सदस्य किरण गांगुर्डे, राकेश थोरात, महेंद्र पारख, राजश्री पारख, विजय बर्डे, उज्वला धुम, रंजना पाडवी यांनी डॉ. भारती पवार यांचे स्वागत केले. प्रास्तविक किरण गांगुर्डे यांनी केले. वणी ग्रामपालीकेच्या माध्यमातुन विविध विकासाकामासाठी भुतकाळात निधी उपलब्ध करुन दिल्याने आभार मानन्यात आले व उर्वरीत विकासकामांसाठी निधीची उपलब्धता करुन देण्याची मागणी करण्यात आली..

वणी येथुन चंडिकापुर मार्गे पायी जाणार्या रस्त्याचे कामकरण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य व जगदंबा देवी संस्थान सदस्य राकेश थोरात यांनी केली. उपसरपंच विलास कड यांनी दिंडोरी तालुक्यातील धरणसाठा भविष्यातील पाणी टंचाई लक्षात घेता सुरक्षित राहणेसाठी योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी केली.

नितीन झोटींग यांनी समाजमंदिरासाठी निधी उपलब्ध करुन दिल्याने डा भारती पवार यांचे आभार मानले. याप्रसंगी तहसीलदार पंकज पवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश बोडखे, कैलास धुम, मयुर जैन, कुंदन जावरे, उमेश बोरा, विरेंद्र खैरनार, निखिल कटारीया, आनंद समदडीया, भरत शिरसाठ, पियुष पारख यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या