दिल्ली l Delhi
केंद्रीय मंत्री रामविलास पासवान(Union minister Ram Vilas paswan) आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष व रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग पासवान(Lok Janshakti Party national president Chirag Paswan) यांनी यासंदर्भात भावनिक पत्र लिहून माहिती दिली.
काही दिवसात होणार्या बिहार विधानसभा निवडणुकांच्या(Bihar Assembly elections) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशातच रामविलास पासवान अतिदक्षता विभागात असल्याने समर्थकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. केंद्रात ग्राहक व्यवहार, अन्न आणि पुरवठा मंत्री विभागाची धुरा सांभाळणारे रामविलास पासवान राज्यसभा खासदार आहेत.
चिराग पासवान यांनी म्हंटले आहे पत्रात ?
“करोना संक्रमण काळात लोकांना रेशन मिळण्यास त्रास होऊ नये, म्हणून वडिलांनी नियमित आरोग्य तपासणी पुढे ढकलली. यामुळे ते आजारी पडले. गेल्या तीन आठवड्यांपासून ते रुग्णालयात आहेत. मुलगा या नात्याने मी वडिलांना रुग्णालयात पाहून खूप अस्वस्थ होतो. वडिलांनी मला बर्याच वेळा पाटण्याला जाण्याचा सल्ला दिला, पण मुलगा म्हणून त्यांना आयसीयूमध्ये सोडून कुठेही जाणे शक्य नाही. आज जेव्हा त्यांना माझी गरज आहे, तेव्हा मी त्यांच्याबरोबर रहावे अन्यथा तुम्हा सर्वांचा राष्ट्रीय अध्यक्ष स्वत:ला कधीही क्षमा करु शकणार नाही. पक्षाध्यक्ष या नात्याने आपल्याला त्या सहकाऱ्यांचीही चिंता आहे, ज्यांनी आपले जीवन ‘बिहार फर्स्ट बिहारी फर्स्ट’ साठी समर्पित केले आहे. आघाडीतील मित्रपक्षांशी बिहारच्या भवितव्याविषयी किंवा जागावाटपाबद्दल आजपर्यंत कोणतीही चर्चा झालेली नाही. मी लवकरच आपल्यामध्ये येईल.”