Thursday, May 2, 2024
Homeजळगावगाळेधारकांचा संताप : मनपा प्रशासनाची उचलली तिरडी

गाळेधारकांचा संताप : मनपा प्रशासनाची उचलली तिरडी

जळगाव- Jalgaon

जळगाव शहर महानगरपालिका मार्केट गाळेधारक संघटनेतर्फे पुकारलेल्या बेमुदत साखळी उपोषणचा गुरुवारी दहावा दिवस होता. दरम्यान, मनपाची प्रतिकात्मक तिरडी उचलून गाळेधारकांनी अनोखे आंदोलन करत मनपा प्रशासनाचा निषेध केला.

- Advertisement -

शहरातील १६ मार्केटच्यागाळेधारकांचे विविध मागण्यांसाठी बेमुदत साखळी उपोषण करण्यात येत असून दररोज वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्यात येत आहे. आज गाळेधारकांनी तिरडी आंदोलन केले. आज तर प्रतिकात्मक तिरडी आंदोलन आहे. भविष्यात शेकडो खर्‍या तिरडया निघतील व त्याचे उत्तर मनपालाच दयावे लागेल असा टाहो गाळेधारकांनी फोडला. जिवंतपणीच तिरडीवर जाण्याचे दुर्भाग्य गाळेधारकांच्या नशिबी आल्याचा संतापही गाळेधारकांनी यावेळी केला.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु असलेल्या उपोषणस्थळी सकाळी ९ ते १ वाजेपर्यंत चौबे मार्केटमधील गाळेधारक वसीम काझी, अमित भावनानी, स्वप्निल शिनकर, बाबूलाल जैन, जावेद शेख तर दुपारी १ ते ५ वाजेपर्यंत मजीद शेख, प्रकाश तिवारी, ललित मराठे, अनिल जगताप, हितेश शहा आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी संघटनेचे अध्यक्ष डॉ.शांताराम सोनवणे, पांडुरंग काळे, राजस कोतवाल, युवराज वाघ, तेजस देपुरा, पंकज मोमाया, रिजवान जागीरदार, प्रदीप श्रीश्रीमाळ, आशिष सपकाळे, विलास सांगोरे उपस्थित होते.

आज ‘व्यर्थ न हो बलिदान’ आंदोलन
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मनपा गाळेधारक संघटनेतर्फे बेमुदत साखळी उपोषण सुरु आहे. उद्या अकराव्या दिवशी दि. २५ रोजी छत्रपती शाहू मार्केटतर्फे व्यर्थ न हो बलिदान आंदोलन करण्यात येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या