Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यादिव्यांगांसाठी अनोखे उद्यान

दिव्यांगांसाठी अनोखे उद्यान

नवीन नाशिक । प्रतिनिधी New Nashik

दिव्यांगांसाठी disabled महाराष्ट्रातील पहिले उद्यान Garden आणि जिम नवीन नाशकातील साईग्राम सोसायटीत साकारत आहे. नाशिक विकास मंचच्या Nashik Vikas Manch प्रयत्नाने ही संकल्पना मूर्त रूपात येणार आहे.

- Advertisement -

नाशिक शहरासह इतरत्र सर्वांना व्यायाम करता येईल तसेच उद्यानात खेळता येईल, अशी नाना प्रकारची साधने उपलब्ध आहेत. मात्र दिव्यांगांसाठी सोयीची अशी सुविधा राज्यात कोठेही उपलब्ध नाही. नाशिक विचार मंचने अ‍ॅड. मनोज आहेर यांच्या संकल्पनेतून दिव्यांगांसाठी वेगळ्या पद्धतीने डिझाईन करून उद्यान व ग्रीन जिम तयार करण्यासाठी राज्यसभा खासदार डॉ. नरेंद्र जाधव MP Narendra Jadhav यांना साकडे घातले. त्याबाबतचे पत्र डॉ. जाधव यांना देऊन या प्रकल्पासाठी खासदार निधीतून 10.5 लाख रुपये मंजूर करून आणले.

आगामी काळात तयार होणार्‍या या वैशिष्ट्यपूर्ण उद्यान व ग्रीन जिममुळे नवीन नाशकातीलच नव्हे तर नाशिक शहरातील दिव्यांगांना त्याचा फायदा होणार आहे. करोनाचे सावट अद्यापही संपलेले नसल्याने पोलीस आयुक्तालयाकडून भूमिपूजन कार्यक्रमाला परवानगी मिळाली नाही. काम पूर्ण झाल्यावर उद्घाटन करण्यात येईल, असे नाशिक विचार मंचकडून सांगण्यात आले.

खा. डॉ. जाधव यांची तत्परता

काही दिव्यांग बांधवांनी दिव्यांगांसाठी उद्यानाची संकल्पना मांडली होती. तसे काही उद्यान व ग्रीन जिम तयार करता येईल का? याबाबतचा विचार खा. नरेंद्र जाधव यांच्याकडे मांडला. त्यांनी त्यास तत्काळ मंजुरी दिली. या कामाची वर्कऑर्डरदेखील निघाली आहे व येत्या काही दिवसांत काम पूर्णत्वास येईल.

अ‍ॅड. मनोज आहेर, अध्यक्ष, नाशिक विचार मंच

- Advertisment -

ताज्या बातम्या