Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यावर अवकाळी पावसाचे सावट

राज्यावर अवकाळी पावसाचे सावट

नवी दिल्ली –

महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये 16 ते 20 फेब्रुवारीदरम्यान अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे असा अंदाज स्कायमेटने

- Advertisement -

वर्तविला आहे.

स्कायमेटचे शास्त्रज्ञ महेश पालावल म्हणाले, 16 ते 20 फेब्रुवारीदरम्यान देशातील काही राज्यांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पावसाला आम्ही अवकाळी पाऊस असेच संबोधणार आहोत. या अवकाळी पावसाचा फटका, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओदिशा, झारखंड, छत्तीसगड, कर्नाटकचा अंतर्गत भाग, तेलंगणा आणि तामिळनाडूला बसणार आहे. या राज्यांमध्ये 16 ते 20 फेब्रुवारीदरम्यान पाऊस पडू शकतो, असे त्यांनी सांगितले.

हा अवकाळी पाऊस म्हणजे मान्सूनपूर्व पर्जन्य नसेल. कारण मान्सूनपूर्व पावसाची सुरुवात तापमान एका निश्चित मर्यादेच्या वर गेल्यावर होते. मात्र सध्यातरी अनेक राज्यांमध्ये पारा हा सामान्य तापमानापेक्षा खाली आहे.

पूर्व मध्य प्रदेश आणि त्याच्या लगतच्या छत्तीसगड तसेच विदर्भाच्या वर एक चक्रिवादळी हवांचे क्षेत्र विकसित होऊ शकते. या माध्यमातून तेलंगाणमधून दक्षिण तामिळनाडूपर्यंत एक ट्रफ विकसित होऊ शकते. या दोन्ही हवामानाच्या परिस्थितीमुळे देशातील अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामधून बाष्प देशातील भूभागावर येईल त्यामुळे हवामान बिघडून पाऊस पडू शकतो.

- Advertisment -

ताज्या बातम्या