Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिकमध्ये अवकाळी पावसाला सुरुवात; हवामान विभागाचा काय आहे अंदाज? जाणून घ्या

नाशिकमध्ये अवकाळी पावसाला सुरुवात; हवामान विभागाचा काय आहे अंदाज? जाणून घ्या

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. अवकाळी पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे…

- Advertisement -

आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास शहरातील काही भागात अवकाळी पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाल्याचे चित्र आहे.

आज सकाळपासून काही वेळ ऊन तर काही वेळ ढगाळ वातावरण होते. दुपारी दीड वाजेच्या सुमारास अचानक ढग दाटून आले आणि दोन वाजता नाशकात अवकाळी पावसाने हजेरी लावली.

Photo Gallery : शालिमार परिसरातील दुकाने मनपाकडून जमीनदोस्त

दरम्यान, पुढील चार दिवस राज्यभरातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. गुरुवारी संपूर्ण राज्यात अवकाळीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

मोठी बातमी! जम्मू-काश्मीरात लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं

तर शुक्रवारी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शनिवारी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांत पावसाचा इशारा देण्यात आला असून रविवारी विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या