Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशज्ञानवापीवरुन योगी आदित्यनाथ आक्रमक ; म्हणाले, ...

ज्ञानवापीवरुन योगी आदित्यनाथ आक्रमक ; म्हणाले, …

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi

गेल्या काही महिन्यांपासून वाराणसी (Varanasi) येथील ज्ञानवापी मशिदीवरून (Gyanvapi) वाद सुरू आहे. काशी विश्वनाथ मंदिर पाडून तिथे ज्ञानवापी मशीद बांधण्यात आली, असा दावा हिंदू संघटनांनी केला आहे. हे प्रकरण आता न्यायालयात पोहोचले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी मोठे विधान केले आहे.

- Advertisement -

ज्ञानवापीला मशीद म्हटल्यास वाद होईल असे त्यांनी म्हटले आहे. तसेच त्रिशूळ मशिदीत काय करत आहे? आम्ही तर ठेवले नाही अशी विचारणाही त्यांनी केली आहे. याप्रकरणी मुस्लीम पक्षकारांनी पुढे यावे आणि सांगावे की, ही इतिहासातील चूक असून त्यावर उपाय काढण्याची गरज आहे.

“५० खोक्यांसाठी आपला आत्मा विकलेल्यांनी…”; शिरसाटांच्या ‘त्या’ विधानाला प्रियंका चतुर्वेदींचे सणसणीत प्रत्युत्तर

एएनआयशी बोलताना सीएम योगी म्हणाले, “आपण याला मशीद म्हटले तर वाद होईल. ज्याला देवाने दृष्टी दिली आहे, त्याला मशिदीच्या आत त्रिशूल का आहे ते पाहू द्या. आम्ही ते ठेवलेले नाही. तेथे ज्योतिर्लिंग आहेत. देवाच्या मूर्ती आहेत. संपूर्ण भिंती काय ओरडून सांगत आहेत.”ते म्हणाले, “मला वाटते हा प्रस्ताव मुस्लिम समाजाकडून आला पाहिजे की… ही एक ऐतिहासिक चूक झाली आहे. आम्हाला त्या चुकीवर उपाय हवा आहे.”

दरम्यान, पुढे ते असे ही म्हणाले की, आपला देश संविधानावर चालतो, कुठलेही मत किंवा धर्माच्या आधारावर चालत नाही. एक लक्षात घ्या, मी ईश्वराचा भक्त आहे, पण कुठल्याही ढोंगीपणावर विश्वास ठेवत नाही आणि इतरांनीही ठेवू नये. तुमचे मत, तुमचा धर्म तुमच्या घरापर्यंत मर्यादित असू द्या.

नितीन गडकरींचा शरद पवारांवर निशाणा ; म्हणाले, शरद पवार म्हणजे…

धर्म हा मशिदीपर्यंत अथवा प्रार्थनास्थळापर्यंत असेल. या गोष्टी रस्त्यावर आणू नका. तुमच्या या गोष्टी तुम्ही इतरांवर लादू शकत नाही. या देशात कोणाला राहायचे असेल तर त्याच्यासाठी राष्ट्र प्रथम असले पाहिजे. तुमचे मत किंवा तुमचा धर्म यापेक्षा राष्ट्र सर्वात पुढे असायला हवे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या