Monday, May 6, 2024
Homeनगरउर्ध्व गोदावरी प्रकल्पास पुन्हा प्रशासकीय मान्यता

उर्ध्व गोदावरी प्रकल्पास पुन्हा प्रशासकीय मान्यता

मुंबई |प्रतिनिधी| Mumbai

नाशिक जिल्ह्यातील उर्ध्व गोदावरी प्रकल्पाच्या 1498 कोटी 61 लाख रुपये खर्चास चौथी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून हा प्रकल्प आदिवासी क्षेत्रात असल्याने गोदावरी नदीच्या उपनद्यांवर आहे. या प्रकल्पामुळे नाशिक ,अहमदनगर औरंगाबाद जिल्ह्यातील 74210 हेक्टर सिंचन क्षेत्रात याचा लाभ होणार आहे. यामुळे नाशिक व नगर जिल्ह्यातील सिंचनाच्या पाण्याची तूट भरून निघणार आहे.

- Advertisement -

काय आहे ऊर्ध्व गोदावरी प्रकल्प

ऊर्ध्व गोदावरी प्रकल्प पासून नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद जिल्ह्यातील एकूण 74210 हेक्टर सिंचन क्षेत्राची निर्मिती होणार आहे. 1966 मध्ये 14.29 कोटी रुपये खर्चाची मूळ प्रशासकीय मान्यता मिळालेल्या या प्रकल्पाला 1999 मध्ये 189.98 कोटी रुपयांची प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली. त्यानंतर पुन्हा 2008 मध्ये 439.12 द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली. मात्र दरसूचीतील बदल भूसंपादनाच्या किमतीतील वाढ सविस्तर संकल्पनेनुसार करण्यात आलेल्या वाढीव तरतुदी आदींमुळे प्रकल्पाच्या किमतीत वाढ झाली होती. तेव्हा 2017 ला या प्रकल्पासाठी 917 कोटी 74 लाख रुपयांच्या तृतीय सुधारित प्रशासकीय प्रस्तावास मंजुरी देण्यात आली होती आणि आता चौथी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या