Friday, May 3, 2024
Homeनगरसोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा..

सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा..

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

करोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत असताना दुसरीकडे ग्रामीण भागात मात्र सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असल्याचे चित्र आहे. खताच्या गोण्या अडीचशे अन् घेणारे शेतकरी हजार… यामुळे शेतकरी करोना नियमांना हरताळ फासत असल्याचे चित्र नगर तालुक्यातील रूईछत्तीसी येथे दिसून आले.

- Advertisement -

रुईछत्तीशी गावाात महीनाभरापासून युरियाची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. मठपिंप्री, हातवळण, वडगाव, गुणवडी, अंबिलवाडी, वाटेफळ, साकत तसेच बीड जिल्ह्यातील कोयाळ, सांगवी, पारोडी या गावातील शेतकर्‍यांना खतांचा पुरवठा रूईछत्तीसी गावातून होतो. स्वामी समर्थ आणि भोस कृषी सेवा केंद्र ही दोन मोठी दुकाने आहेत.

दुकानात दररोज शेकडो शेतकरी खतांच्या मागणीसाठी गर्दी करतात. परंतु दुकानात युरियाच उपलब्ध नाही. काल अडीचशे युरियाच्या गोण्या आल्या. त्या खरेदीसाठी शेतकर्‍यांनी रांगा लावल्या. रांगेत हजारावर शेतकरी रांगेत उभे राहिले. आता दोन दिवसांत युरिया आला नाहीतर आंदोलनाचा इशारा रांगेतील शेतकर्‍यांनी दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या