नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
व्हेनेझुएलाची राजधानी कराकसवर अमेरिकेने सात हवाई हल्ले केले आहेत. अमेरिकन मीडिया सीबीएस न्यूजनुसार, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लष्करी तळ आणि व्हेनेझुएलातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणी हल्ले करण्याचे आदेश दिले. अमेरिकेने वेनेजुएलाची राजधानी काराकासमधील मोठ्या मिलिट्री बेसवर हल्ला केला आहे. काराकासमध्ये नेवी बेसवर हल्ला केला आहे. पेंटागनने नेवीबेसला टार्गेट केले. शनिवारी मध्यरात्री २ च्या सुमारासा व्हेनेझुएलाची राजधानी काराकास येथे कमीत कमी सात स्फोटाचे आवाज ऐकू आले.
शहरातून धुराचा लोळ उठताना दिसला. व्हेनेझुएलाच्या संरक्षण मंत्र्यांच घर आणि मिलिट्री बेसला टार्गेट करण्यात आले आहे. स्थानिक वेळेनुसार पहिला स्फोट रात्री साधारण १.५० वाजता झाला. त्यानंतर काही भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला. आकाशात विमानांसारखे आवाज ऐकू येत होते. सोशल मीडियावर समोर आलेल्या काही व्हिडीओमध्ये रात्रीच्या अंधारात धुराचे मोठे लोट दिसत आहेत. राष्ट्रपती भवनाच्या परिसरात सतत सायरन वाजत होते आणि लष्करी जवान पहारा देत होते.
सरकारी निवेदनानुसार, राजधानी कराकससह मिरांडा, अरगुआ आणि ला गुइरा या राज्यांमध्ये नागरी आणि लष्करी ठिकाणांवर हल्ले करण्यात आले. ही कारवाई म्हणजे थेट लष्करी आक्रमण असल्याचे सरकारने म्हटले आहे. “अशा प्रकारचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत,” असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.
Nitin Gadkari: मंत्री नितीन गडकरींची आवडती अभिनेत्री कोण? पत्नीसमोर दिली कबुली, फराह खान म्हणाली…
डिसेंबरमध्ये, ट्रम्पने व्हेनेझुएलाकडे बंदी घातलेल्या तेल टँकरच्या हालचालींवर संपूर्ण नाकेबंदीचे आदेश देऊन व्हेनेझुएलावर दबाव वाढवला. ट्रम्प म्हणाले की व्हेनेझुएला दक्षिण अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठ्या नौदल ताफ्याने पूर्णपणे वेढलेला आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथआउट सोशल प्लॅटफॉर्मवर लिहिले की व्हेनेझुएला अमेरिकेतून चोरीला गेलेले तेल, जमीन आणि इतर मालमत्ता परत करेपर्यंत वेढा वाढेल. त्यांनी २२ डिसेंबर रोजी पत्रकारांना सांगितले की मादुरो यांनी सत्ता सोडणे शहाणपणाचे ठरेल, परंतु त्यांचा निर्णय पूर्णपणे त्यांच्या हातात आहे.
वेनेजुएलामध्ये जमिनी कारवाई होऊ शकते असे ट्रम्प यांनी वारंवार म्हटले आहे. म्हणजे अमेरिका त्यांचे सैन्य वेनेजुएलामध्ये घुसवू शकते. मादुरो यांच्यावर सत्ता सोडण्यासाठी ट्रम्प प्रशासन दबाव टाकत आहे. त्यासाठी त्यांनी वेनेजुएलावर कठोर प्रतिबंध लादले आहेत. मादुरो यांनी कुठल्याही गुन्हेगारीशी संबंध असल्याचा आरोप फेटाळून लावला. मला सत्तेवरुन हटवून अमेरिकेचा वेनेजुएलाच्या मोठ्या तेल साठ्यावर आणि नैसर्गिक साधन संपत्तीवर डोळा आहे असे मादुरो यांचे म्हणणे आहे.
अमेरिकेने मादुरोंवर ड्रग्ज तस्करीत सहभागी असल्याचा आरोप बराच काळ केला आहे, दुसरीकडे, मादुरो म्हणतात की अमेरिका त्यांना सत्तेवरून काढून टाकू इच्छिते, परंतु देश आणि सैन्य कोणत्याही बाह्य हस्तक्षेपाचा प्रतिकार करेल. सप्टेंबरपासून अमेरिकन सैन्याने डझनभर ड्रग्ज बोटींवर हल्ला केला आहे, ज्यामध्ये १०५ लोक मारले गेले आहेत. मानवाधिकार संघटनांचे म्हणणे आहे की अमेरिका पुराव्याशिवाय लोकांना मारत आहे आणि हे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करते.
दरम्यान, सध्या कराकसमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात असून लष्करी हालचाली वाढल्या आहेत. स्फोटांचे नेमके कारण काय, याबाबत अजून स्पष्ट माहिती समोर आलेली नसली तरी राजधानीसह संपूर्ण देशात तणावाचे वातावरण आहे.




