Friday, May 29, 2026
Homeदेश विदेश"मी माझे मित्र नरेंद्र मोदींशी बोललो, भारताचे आभार मानतो"; नेतान्याहू-मोदींमध्ये संवाद, काय...

“मी माझे मित्र नरेंद्र मोदींशी बोललो, भारताचे आभार मानतो”; नेतान्याहू-मोदींमध्ये संवाद, काय झाली दोघांमध्ये चर्चा?

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
इस्रायल आणि अमेरिकेकडून इराणवर करण्यात आलेल्या संयुक्त हल्ल्यानंतर परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे. दरम्यान, सोमवारी (२ मार्च २०२६) पंतप्रधान मोदींनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट केले की त्यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी सध्याच्या परिस्थितीबद्दल संपर्क करत संवाद साधला. यानंतर आता बेंजामिन नेतान्याहू यांनी थेट पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्यासोबत माझा बराचवेळ फोनवर संवाद झाल्याचे म्हटले आणि आभारही व्यक्त केले.

- Advertisement -

बेंजामिन नेतान्याहू यांनी युद्धाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांसोबत संवाद साधत म्हटले की, मी माझे मित्र नरेंद्र मोदी यांच्यासोबत बोललो. माझ्यात आणि त्यांच्यात बऱ्याचवेळ फोनवर चर्चा झाली. या काळात इस्त्रायलच्या मागे उभे राहिल्याबद्दल मी भारताचे आभार मानतो, असे म्हंटले आहे.

बेंजामिन नेतन्याहू काय म्हणाले?
पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले कि, “मी माझे मित्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोललो आहे. मी त्यांच्याशी दीर्घकाळ चर्चा केली. या काळात इस्रायल आणि यहुदींच्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल मी त्यांचे आणि भारताचे आभार मानतो.” नेतन्याहू यांनी असेही म्हटले की त्यांनी फोनवर काय चर्चा केली ते ते उघड करणार नाहीत, परंतु त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं कि, पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे की त्यांनी नेतन्याहू यांना अलीकडील परिस्थितीबद्दल भारताच्या चिंता कळवल्या आणि नागरिकांची सुरक्षा सर्वोपरि असली पाहिजे यावर भर दिला.

या दरम्यान, बेंजामिन नेतान्याहू यांनी असेही सांगितले की, इराणचे अणु आणि क्षेपणास्त्र कार्यक्रम संपूर्ण जगासाठी धोका निर्माण करतात आणि इस्रायली सैन्याच्या कृती केवळ इस्रायलचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे रक्षण करण्यासाठी आहेत. नेतान्याहू म्हणाले, “ऑपरेशन रोअरिंग लायनचा हा तिसरा दिवस आहे. इस्रायली सैन्य आणि इस्रायली सरकारने, आमचे मित्र अमेरिका आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या सहकार्याने, इस्रायलला असलेला अस्तित्वाचा धोका आणि अमेरिका आणि संपूर्ण जगाला असलेले मोठे धोके नष्ट करण्यासाठी ही कारवाई सुरू केली आहे.”

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून तातडीची मदत; दुबईत अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी विशेष विमानाची व्यवस्था

नेतान्याहू पुढे म्हणाले, सायप्रसमधील ब्रिटीश लष्करी तळावर इराणने केलेल्या हल्ल्याचा संदर्भ देत ते म्हणाले, “ते मोठ्याने घोषणा देत आहेत: ‘इस्रायल मुर्दावाद, अमेरिका मुर्दावाद.’ ते त्यांचे अंतिम ध्येय आहे, परंतु मी म्हटले होते की ते हस्तक्षेप करणाऱ्यांनाही लक्ष्य करतील. ते युरोपला लक्ष्य करतील आणि त्यांनी तसे केले. ते म्हणाले, “जर या दहशतवादी राजवटीने… अण्वस्त्रे आणि त्यांचा वापर करण्याचे साधन, बॅलिस्टिक आणि आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे मिळवली तर ती संपूर्ण जगाला धोका निर्माण करेल.” म्हणून आपण स्वतःचे रक्षण करण्याचा संकल्प केला आहे, पण असे करताना आपण इतरांचेही रक्षण करत आहोत.”

Ali Khamenei Death: चौकाचौकातील कॅमेरे हॅक, मोबाईल नेटवर्कवर हॅकर्सचा ताबा; खामेनेईंवर हल्ला कसा रचला?

ताज्या बातम्या

Crime News : स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्रीचे रॅकेट उघड

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar शहरातील अहिल्यानगर-मनमाड रस्त्यालगत असलेल्या साई मिडास इमारतीमध्ये अँक्यूम स्पा सेंटरवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने बुधवारी (27 मे) रात्री धाड टाकून सुरू...