Friday, May 29, 2026
Homeदेश विदेशAli Khamenei Death: चौकाचौकातील कॅमेरे हॅक, मोबाईल नेटवर्कवर हॅकर्सचा ताबा; खामेनेईंवर हल्ला...

Ali Khamenei Death: चौकाचौकातील कॅमेरे हॅक, मोबाईल नेटवर्कवर हॅकर्सचा ताबा; खामेनेईंवर हल्ला कसा रचला?

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
इस्रायलने शनिवारी इराणवर केलेल्या हल्ल्यात त्यांचे सर्वोच्च नेते अयतुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला आहे. इस्त्रायल आणि अमेरिकेने अचूक योजना तयार करून सर्वोच्च नेत्याला ठार केले. या हल्ल्याच्या सहा दिवस आधी म्हणजेच २२ फेब्रुवारीला खामेनेई यांना त्यांच्या हत्येची कुणकुण लागली होती. त्यांनी तशा सूचना आपल्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. तसेच त्यांनी दुसरी एक योजना ही तयार केली होती. ते स्वत: देखील खबरदारी बाळगत होते. मात्र एका चुकीमुळे त्यांचा जीव गेला आहे.

- Advertisement -

इस्रायलने असा आखला प्लॅन
अयातुल्लाह अली खामेनी यांच्यावर इस्रायलची गुप्तहेर यंत्रणा अनेक वर्षांपासून करडी नजर ठेवून होती. त्यासाठी तेहरानमधील प्रत्येक सीसीटीव्ही कॅमेरा हॅक करण्यात आला होता. प्रत्येक रस्ता, प्रत्येक चौकातील स्थितीवर इस्रायलचे लक्ष होते. तसेच तेहरानसह इराणच्या मोबाईल नेटवर्कमध्ये देखील इस्रायलने शिरकाव केलेला होता. त्यामुळे खामेनी, त्यांचे सहकारी आणि विविध अधिकाऱ्यांच्या प्रत्येक हालचालीवर इस्रायलची बारीक नजर असल्याचा दावा ब्रिटिश मीडियाने केलाय.

आखाती देशांत अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री ॲक्शन मोडमध्ये; उचललं मोठं पाऊल

सीसीटीव्ही कॅमेरे हॅक केले
इस्रायलच्या गुप्तचर संस्थांनी गेल्या काही वर्षांपासून इराणमधील जवळजवळ सर्व ट्रॅफिक कॅमेरे हॅक केले आहेत. इराणमधील बहुतेक ट्रॅफिक कॅमेऱ्यांमधील लाईव्ह फीड एन्क्रिप्ट केले जात होते आणि तेल अवीव आणि दक्षिण इस्रायलमधील सर्व्हरवर पाठवले जात होते. एका कॅमेरा अँगलला विशेषतः उपयुक्त मानले गेले, ज्यामुळे खामेनीच्या उच्च-सुरक्षेच्या हालचालींचे चित्र अधिक स्पष्ट मिळाले होते.

US-Iran Conflict: मोठी बातमी! जागतिक तेलवाहतुकीला धोका; होर्मुझ सामुद्रधुनीबाबत इराणची कठोर भुमिका, नेमकी काय घडामोड घडली?

एका चुकीमुळे खामेनींचा मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा हा हल्ला झाला तेव्हा इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्ला अली खामेनेई हे आपल्या लष्करी अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेत होते. ही बैठक सुरू असतानाच हल्ला करण्यात आला. खामेनेईंना धोक्याची कसलीच माहिती मिळू नये, याची पूर्ण काळजी इस्रायलने घेतली होती.

याच पार्श्वभूमीवर इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने खामेनेई यांना त्यांचे राहण्याचे आणि कामाचे ठिकाण बदलण्याचा सल्ला दिला होता, परंतु खामेनेई यांचा दृष्टिकोन पूर्णपणे वेगळा होता. ते सुरक्षा उपाय वाढवण्याऐवजी गोष्टी शक्य तितक्या सामान्य ठेवण्यावर भर देत होते. पण त्यांची हीच चूक त्यांच्यासाठी जीवघेणी ठरली. याचाच फायदा इस्त्रायल आणि अमेरिकेने घेतला.

रिपोर्टमध्ये असे ही म्हंटले गेले आहे की खामेनेई यांच्या अंगरक्षकांनी त्यांची वैयक्तिक वाहने कुठे पार्क केली आहेत, गार्डची अदलाबदल कोणत्या वेळी होते कोणत्या मार्गाने हालचाल होते ओळखण्यासाठी एका विशिष्ट कॅमेरा अँगलचा वापर करण्यात आला. ही संपूर्ण प्रक्रिया गुप्तचर भाषेत “पॅटर्न ऑफ लाईफ” यामुळे त्यांच्या कॅम्पसमधील दैनंदिन दिनचर्या आणि सुरक्षा व्यवस्था समजण्यास मदत झाली.

२८ तारीखच का निवडली?
याशिवाय, अमेरिकन गुप्तचर संस्था सीआयएने ऐनवेळी अशी माहिती दिली की हल्ल्याची वेळ रात्रीऐवजी दिवसा निश्चित करण्यात यावी, कारण दिवसा खामेनी स्वतःला जास्त सुरक्षित समजत होते. ते बेसावध असताना हल्ला करण्याचा यामागे हेतू होता. CIA ला कळले की २८ फेब्रुवारी म्हणजेच शनिवारी सकाळी तेहरानमधील याच उच्च सुरक्षा कॅम्पसमधील एका इमारतीत इराणच्या उच्च अधिकाऱ्यांची एक बैठक होणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट ही कळली की खामेनेई देखील यात सहभागी होणार आहेत. अशी संधी पुन्हा मिळणार नाही, हे हेरून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. ज्यात खामेनेई यांच्यासह अनेक महत्त्वाचे अधिकारी आणि कुटुंबातील सदस्यांचा यात मृत्यू झाला.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : 504 दिव्यांग कर्मचार्‍यांची होणार फेरपडताळणी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा परिषदेत नोकरी मिळवण्यासाठी किंवा बदली प्रक्रियेत सवलत घेण्यासाठी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर करणार्‍या कर्मचार्‍यांवर आता थेट निलंबनाची कारवाई न करता, त्यांची...