नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, ट्रुथ सोशलवर एक पोस्ट शेअर करून आंतरराष्ट्रीय जगतात खळबळ उडवून दिली आहे. त्यात त्यांनी ते व्हेनेजुएलाचे प्रभावी राष्ट्रपती असल्याचा दावा केला आहे. अमेरिकेने काही दिवसांपूर्वीच व्हेनेजुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नी सिलिया फ्लोरेस यांना अटक करून अमेरिकेत नेले होते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय वातावरण तंग झाले होते.
डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या फोटोसह पोस्ट शेअर केली ज्यामध्ये त्यांनी स्वत:चा उल्लेख व्हेनेझुएलाचे कार्यवाहक अध्यक्ष म्हणून केला. ज्यानंतर खळबळ उडाली. मुळात म्हणजे सुरूवातीला सांगितले जात होते की, डोनाल्ड ट्रम्प यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये व्हेनेझुएलाचे तेल हवे होते. ज्यावर त्यांनी अगोदरत कब्जा मिळवला. व्हेनेझुएलाचे तेल ते जगभरात विकणार आहेत. मात्र, आता स्पष्ट झाले की, त्यांची नजर फक्त तेलावरच नव्हती तर थेट व्हेनेझुएलावर आहे.
ट्रम्प यांनी काय पोस्ट केली?
व्हेनेजुएलामधील प्रभारी सरकार हे व्हेनेजुएला सुप्रीम ट्रायबुनल ऑफ जस्टीस यांच्याद्वारे घटनाच्या अधीन राहून स्थापित करण्यात आले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष दावा करत आहे तो खोटा आहे.
दरम्यान, राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या अधिकृत ट्रुथ प्लॅटफॉर्मवरून एक विकीपिडियाचा एडिटेड फोटो टाकला आहे. त्यात डोनाल्ड ट्रम्प यांचा फोटो वापरून त्याच्या खाली अॅक्टिंग प्रेसिडेंड ऑफ व्हेनेजुएला असे लिहिले होते.
महत्त्वाची गोष्ट अशी की, ही पोस्ट अशा वेळी आली आहे जेव्हा अमेरिकेने व्हेनेझुएलावर मोठ्या प्रमाणात लष्करी कारवाई सुरू केली आहे. या कारवाईदरम्यान, व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नी सिलिया फ्लोरेस यांना अमेरिकेत नेण्यात आले आणि आता त्यांना नार्को-दहशतवादाच्या आरोपाखाली न्यूयॉर्कमध्ये ताब्यात घेण्यात आले आहे आणि न्यायालयीन कारवाईला सामोरे जावे लागत आहे.
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की सत्तेचे सुरक्षित, न्याय्य आणि वाजवी हस्तांतरण होईपर्यंत अमेरिका व्हेनेझुएलातील सत्ता नियंत्रित करेल. त्यांचा दावा आहे की अमेरिका व्हेनेझुएलाच्या लोकांच्या हितासाठी ही जबाबदारी पार पाडत आहे. यादरम्यान, व्हेनेझुएलाच्या उपराष्ट्रपती आणि तेलमंत्री डेल्सी रॉड्रिग्ज यांनी देशाच्या अंतरिम राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे, परंतु ट्रम्प यांच्या दाव्यामुळे या अंतरिम सरकारच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी असेही म्हटले आहे की व्हेनेझुएलाचे अंतरिम सरकार अमेरिकेला ३० ते ५० दशलक्ष बॅरल उच्च दर्जाचे प्रतिबंधित तेल पुरवेल, जे बाजारभावाने विकले जाईल. त्यातून मिळणारे उत्पन्न अमेरिका आणि व्हेनेझुएला दोघांच्याही फायद्यासाठी वापरले जाईल. त्यांनी अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांना ही योजना त्वरित अंमलात आणण्याचे निर्देश दिले आहेत.
दरम्यान, मादुरो यांनी युएसच्या कोर्टात आपल्या अटकेविरूद्ध जोरदार विरोध दर्शवला आहे. त्यांनी त्यांची अटक म्हणजे आंतरराष्ट्रीय कायद्याचं आणि संप्रभू इम्युनिटीचं उल्लंघन असल्याचं सांगितलं आहे.




