Monday, February 23, 2026
HomeनगरAccident News : उत्तर प्रदेश येथील साईभक्ताचा शिर्डीत अपघाती मृत्यू

Accident News : उत्तर प्रदेश येथील साईभक्ताचा शिर्डीत अपघाती मृत्यू

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

येथे साईच्या दर्शनासाठी आलेल्या एका साईभक्ताचा रविवारी सायंकाळी रेल्वे स्टेशनकडे जात असताना एका खाजगी ट्रॅव्हर्स बसच्या धडकेत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शिर्डीत घडली. अपघातात मृत्यू झालेल्या साईभक्ताचे नाव शैलेंद्र सिंह पटेल (वय 43) रा. मिर्जापूर, उत्तरप्रदेश असे असून या घटनेमुळे नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
घटना घडल्यानंतर शिर्डी पोलिसांनी घटनास्थळी भेट देत जखमीस साईबाबा रुग्णालय येथे दाखल केले.

- Advertisement -

मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. घटनास्थळी मदत करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असताना काही जण मोबाईल चित्रीकरण करत होते त्यामुळे या गोष्टीची नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. खराब रस्ते, भरधाव वाहतूक या मृत्यूस कारणीभूत ठरली आहे. भाविक पायी दर्शनासाठी व रेल्वे स्टेशन, बसस्थानकाकडे जात असतात. अनेक रस्ते खड्डेमय असून खाजगी लक्झरी बसेस, रिक्षा यांची मोठी वर्दळ असते. पोलिसांची नजर चुकवत वाहने, खासगी बस, ट्रॅव्हलर्स आणि दुचाकी वाहने नियमांचे उल्लंघन करतात. त्यामुळे अनेक अपघात घडत आहेत.

YouTube video player

ट्रॅव्हल बस क्रमांक ए आर 01 डब्ल्यूओ 911 ही बस शिर्डीकडून कोपरगाव दिशेन जात असताना निमगाव शिवारात हा अपघात घडला. मयत साईभक्त शैलेंद्र सिंह पटेल यांच्या जवळ लाडू प्रसाद, तीन मोबाईल, काही रोख रक्कम, बँकाचे एटीएम कार्ड पोलिसांना मिळाले. हे चित्र बघून अनेकांनी हळहळ व्यक्त केली. मयताच्या मोबाईलवरून पोलिसांनी संपर्क करून नातेवाईकांना घटनेची माहिती दिली. फरार होणारी लक्झरी बस काही भाविकांनी पकडून चालकास शिर्डी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

शिर्डीतील रस्त्यांची दुरवस्था, नागरिकांची असंवेदनशीलता या घटनेतून पुढे आली आहे. साईबाबा संस्थानने साईभक्त भाविकांना सोडण्यासाठी बसेस उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. जर आणण्यासाठी बसेस आहेत तर सोडण्यासाठी बसेस सुरू केल्या तर अनेकांचे प्राण वाचू शकतील, अशी चर्चा शिर्डीतील नागरिकांमध्ये सुरू होती.

ताज्या बातम्या

महाराष्ट्राच्या राजकारणातील एक ‘आधारवड’ हरपला; स्व.अजित दादांवर बोलताना मंत्री छगन भुजबळ...

0
मुंबई | वृत्तसंस्था Mumbai दादांच्या कामाची शिस्त, वक्तशीरपणा आणि सामान्यांच्या प्रश्नांची जाण हा सर्वांसाठी एक वस्तुपाठ होता. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक ‘आधारवड’ आज उन्मळून पडला आहे....