Friday, May 3, 2024
Homeनाशिकनाशकात पुढील दोन दिवस लसीकरण बंद; हे आहे कारण

नाशकात पुढील दोन दिवस लसीकरण बंद; हे आहे कारण

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक शहरात शनिवारी आणि रविवारी करोना लसीकरण बंद राहणार असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे…

- Advertisement -

४५ वर्षांच्या पुढील नागरिकांचे लसीकरण बंद राहणार असल्याची माहिती मिळते आहे. १८ ते ४४ वर्षांच्या पुढील नागरिकांचे लसीकरण होणार की नाही याबाबत महापालिका प्रशासनाकडून कुठलीही माहिती देण्यात आली नाही.

नाशकात लसींचा पुरवठा घटला असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. लसीचा पुरवठा झाल्यानंतर पुढील सूचना काढण्यात येईल अशी माहितीदेखील महापालिकेने दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या