Wednesday, February 4, 2026
Homeक्रीडाVaibhav Suryawanshi : वैभव सूर्यवंशी याच्या वाढल्या अडचणी, भारतात दाखल होताच होणार...

Vaibhav Suryawanshi : वैभव सूर्यवंशी याच्या वाढल्या अडचणी, भारतात दाखल होताच होणार चाैकशी

दिल्ली । Delhi

युवा कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेला स्टार क्रिकेटर वैभव सूर्यवंशी सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. पहिल्या सामन्यात शतक ठोकून त्याने लक्ष वेधले असले तरी, आता मायदेशी परतताच त्याला मोठ्या फिटनेस चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. राजस्थान रॉयल्सचे प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी वैभवला फोनवरून थेट इशारा दिल्याने त्याच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

- Advertisement -

वैभव सूर्यवंशी सध्या युवा कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळत आहे. त्याने पहिल्या सामन्यात जलद शतक करत इतिहास रचला होता आणि सर्वांची मने जिंकली होती. त्याच्या या धमाकेदार खेळावर राजस्थान रॉयल्सचे हाय परफॉर्मन्स संचालक झुबिन भरुचा यांनी थेट सचिन तेंडुलकरचे उदाहरण देत त्याला लवकर वरिष्ठ संघात घेण्याची मागणी केली होती. मात्र, आता वरिष्ठ संघात निवड होण्यापूर्वीच वैभवच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

YouTube video player

माजी फलंदाजी प्रशिक्षक आणि राजस्थान रॉयल्सचे प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी नुकताच वैभव सूर्यवंशीला फोन केला. दोघांमध्ये झालेल्या संभाषणात राठोड यांनी वैभवला थेट विचारले, “तुझा फिटनेस कसा आहे?”. वैभवने उत्साहाने “फिटनेस मस्त आहे,” असे उत्तर दिले खरे, पण राठोड यांना त्याचे बोलणे फारसे पटले नाही. त्यांनी लगेचच वैभवला थेट इशारा दिला. ते म्हणाले, “तू परत ये… आपण बघूयात!” राठोड यांच्या या बोलण्यातून स्पष्ट होते की, वैभव ऑस्ट्रेलियातून परत येताच त्याची कठोर चाचणी घेतली जाईल आणि त्याच्या फिटनेसची कसून चौकशी केली जाईल.

आयपीएलमुळे वैभव सूर्यवंशीला खास ओळख मिळाली. तो राजस्थान रॉयल्स संघाकडून आयपीएल खेळतो. २०२५ च्या हंगामात गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात त्याने केवळ ३४ चेंडूत शतक ठोकून आयपीएलमध्ये धुमाकूळ घातला होता. याच हंगामात त्याने षटकार मारून आपले खाते उघडले होते. सध्या राजस्थान रॉयल्स संघ वैभवचा भारतीय वरिष्ठ संघात समावेश व्हावा यासाठी प्रयत्नशील आहे. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सचे प्रशिक्षक विक्रम राठोड हे वैभवच्या फिटनेस स्तरावर गंभीरपणे काम करताना दिसत आहेत आणि त्यासाठीच त्यांनी हा थेट इशारा दिल्याचे मानले जात आहे.

ताज्या बातम्या

Rahata : लोणीचे हवालदार साळवी निलंबित; काय आहे कारण?

0
राहाता |प्रतिनिधी| Rahata राहाता तालुक्यातील ममदापूर येथे सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करणे आणि आरोपींशी आर्थिक हितसंबंध जोपासल्याचा ठपका ठेवत, लोणी पोलीस...