Friday, November 22, 2024
Homeनगरजीव धोक्यात घालून शेतकऱ्यांनी पकडले ATM चोर, नेमकं काय घडलं?

जीव धोक्यात घालून शेतकऱ्यांनी पकडले ATM चोर, नेमकं काय घडलं?

वैजापूर । प्रतिनिधी

सटाणा मालेगाव (Satana Malegoan) भागातील एका एटीएम (ATM) मशीनवर दरोडा टाकून सोबत मशीन घेऊन फरार होण्याच्या मार्गावर असलेल्या चोरट्यांना तलवाडा (Talwada) परिसरातील शेतकऱ्यांनी शिताफीने आणि जीव धोक्यात घालून पकडल्याची घटना गुरुवारी (दि .११ जुलै) रोजी सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. दरम्यान दीड तासांनी घटनास्थळी पोहोचणाऱ्या शिऊर पोलिसांच्या आरोपींना स्वाधीन करण्यात आले.

- Advertisement -

वैजापूर (Vaijapur) तालुक्यातील तलवाडा येथे शेतकऱ्यांनी (Farmers) मोठ्या शिताफीने एटीएम चोरट्यांना पकडुन पोलिसांच्या स्वाधीन केले. गुरुवारी ११ जुलै रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास हा थरारक प्रकार घडला. सकाळी लघुशंकेसाठी हे चोरटे रस्त्यालगत थांबले होते. दरम्यान त्यांच्या हालचाली वरून काही शेतकऱ्यांना संशय आल्याने त्यांनी इतर शेतकऱ्यांना ही बाब कळवून या वाहनाचा पाठलाग केला. (Vaijapur crime news)

हे देखील वाचा :  उभ्या असलेल्या कंटेनरवर कार जाऊन धडकल्याने भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

दरम्यान, शेतकरी पाठलाग करत असल्याचे लक्षात येताच पळून जाण्याचा बेतात असलेल्या दोघांना नागरिकांनी पकडत बांधून ठेवले. दरम्यान यातील एक आरोपी पळताना विहिरीत पडला तेव्हा त्याला शेतकऱ्यांनी दोरखंडाच्या मदतीने बाहेर काढले. त्यातील त्यांचा एक साथीदार फरार झाला आहे. चोरट्यांच्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये एटीएम आढळून आल्याने गावकऱ्यांनी चोरट्यांना बांधून ठेवत शिऊर पोलिसांना संपर्क केला.

पेट्रोलिंग वर असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याने घटनास्थळी धाव घेतली. परंतु, ठाणे प्रमुख यांना घटनास्थळी येण्यास तब्बल दीड तास लागले. त्यानंतर दोघा चोरट्यांना आणि त्यांच्या ताब्यातील मुद्देमालास ताब्यात घेत ठाणे प्रमुखांनी घटनास्थळी आणि शिऊर पोलीस ठाणे येथे फोटो सेशन केले. चोरट्यांच्या ताब्यातून एटीएम, स्कॉर्पिओ वाहन व चाकू असा मुद्देमाल जप्त केला आहे.

वाहनात असलेले एटीएम मशीन हे सटाणा रोड मालेगाव पासून १०-२० किमी अंतरावरून चोरी केले असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.गावकऱ्यांनी पकडुन बांधून ठेवलेल्या पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून विष्णू रामभाऊ आकात (वय २९ वर्षे) राहणार सातवण तालुका परतूर जिल्हा जालना व देवा सुभाष तावडे (वय २०) राहणार पुंडलिक नगर अशी ताब्यात घेतलेल्या दोघा संशयितांची नावे आहेत.तर संशयितांचा एक साथीदार पळाला असल्याची माहिती शिऊर पोलिसांनी दिली.

व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या