Monday, May 6, 2024
Homeनाशिकवलखेड ग्रामपंचायत निवडणूकीचा बिगुल

वलखेड ग्रामपंचायत निवडणूकीचा बिगुल

वलखेड । Valkhed

दिंडोरी तालुक्यातील वलखेड येथील ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असल्याने इच्छुक उमेदवार व कार्यकर्ते हे कामास लागले आहे.

- Advertisement -

येथे उमेदवाराने नामनिर्देशन पत्र बुधवार दि. २३/१२/२० ते बुधवार दि. ३०/१२/२० सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत व दि. २५,२६,२७ ची सार्वजनिक सुट्टी वगळून जनता विद्यालय दिंडोरी येथे स्वीकारण्यात येतील.

नामनिर्देशन पत्रांची छाननी ३१/१२/२० गुरुवार रोजी सकाळी ११ ते छाननी संपेपर्यंत राहील उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र मागे घेण्यासाठी सोमवार दि.४/१/२१ दुपारी ३ वाजेपर्यंत असून त्यानंतर उमेदवारांना चिन्ह वाटप होईल मतदान शुक्रवार दिनांक १५/१/२० रोजी ७-३० ते ५-३० वाजेपर्यंत असणार आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असल्यामुळे इच्छुक उमेदवारांची धावपळ उडाली आहे. निवडणुकीमुळे ठीक ठिकाणी ग्रामस्थ कार्यकर्ते चर्चा करताना दिसत आहे. सरपंच पदाचे आरक्षण निवडणुकीनंतर असल्याने मातब्बरांचा हिरमोड झाला असला तरी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

नेतेमंडळींच्या पडद्याआडून हालचाली सुरू झाल्या आहे. गावकारभारी होण्यासाठी तरुण वर्ग पुढे सरसावला आहे. गावातील सत्ताधारी व विरोधी गट सक्रिय झाले आहेत.

लग्न तिथी व कार्यक्रमांना उमेदवार हजेरी लावताना दिसत आहे. प्रभाग क्रमांक १ – अनुसूचित जमाती साठी १, सर्वसाधारण स्त्री २ .

प्रभाग क्रमांक २ – अनुसूचित जमाती १, नागरीकांचा मागास प्रवर्ग १, अनुसूचित जमाती स्‍त्री राखीव १, प्रभाग क्रमांक -३, अनुसूचित जमाती स्‍त्री राखीव १, नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री १, जनरल १ असे आरक्षण असून एकुण मतदार संख्या १२९५ आहे. उमेदवारांना प्रचारासाठी एक महिन्याचा अवधी असल्यामुळे महिनाभर कार्यकर्ते व मतदारांची चंगळ असेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या