Thursday, May 2, 2024
Homeनाशिकमूल्यशिक्षण ही सामाजिक गरज : वारुळे

मूल्यशिक्षण ही सामाजिक गरज : वारुळे

हरसूल । वार्ताहर Harsul

‘घटनेने घालून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी (Enforcement of rules) करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. नियम हे मानवी जीवन सुसह्य करण्यासाठी असतात. मूल्य शिक्षण (education) ही सामाजिक गरज आहे’, असे प्रतिपादन हरसूल पोलीस ठाण्याचे (Harsul Police Station) सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे (Assistant Inspector of Police Ganesh Warule) यांनी केले.

- Advertisement -

हरसुल (harsul) येथील महात्मा गांधी विद्यामंदिर (Mahatma Gandhi Vidyamandir) संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे (National Service Plan) विशेष श्रमसंस्कार शिबीर चिखलपाडा येथे संपन्न नुकतेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोतीराम देशमुख यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोतीराम देशमुख यांनी विद्यार्थ्यांच्या (students) सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयातील प्रत्येक घटक हा कटिबद्ध असल्याचा विश्वास दिला.

सामाजिक कार्यकर्ते देविदास जाधव यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. रासेयोच्या कार्यक्रम अधिकारी डॉ. पूनम बोरसे यांनी सात दिवस चाललेल्या या विशेष श्रमसंस्कार शिबिरामध्ये राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गणेश बारगजे यांनी केले तर आभार प्रा. बी. डी. पगार यांनी मानले.

याप्रसंगी सरपंच मोहन भोये, पोलीस पाटील सुभाष कामडी, प्रा. डी. सी. जाधव, प्रा. हिरामण महाले, आर. टी. शिंदे, रामकृष्ण गर्दे, राहुल मोरे, नाना कोर, अविनाश सूर्यवंशी यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, ग्रामस्थ उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या