Thursday, May 2, 2024
Homeनगरवांबोरी ग्रामीण रूग्णालय असुविधांमुळे गेले ‘कोमात’

वांबोरी ग्रामीण रूग्णालय असुविधांमुळे गेले ‘कोमात’

उंबरे |वार्ताहर| Umbare

वांबोरी ग्रामीण रुग्णालयाच्या (Vambori Rural Hospital) कारभारामध्ये सुधारणा होऊन रुग्णांना योग्य आरोग्य सेवेसह (Health Services) निवासी वैद्यकीय अधिकारी न (Resident Medical Officer) मिळाल्यास आरोग्य केंद्रास कुलूप लावून राज्याच्या आरोग्यमंत्र्यांना कुलुपाच्या चाव्या पाठवल्या जातील, असा इशारा (Hint) वांबोरी येथील प्रा. शामराव पटारे यांनी दिला होता. याची तात्काळ दखल घेऊन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (Minister of State Prajakt Tanpure) यांनी तीन दिवसापूर्वी सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान वांबोरी ग्रामीण रुग्णालयाला (Vambori Rural Hospital) अचानक भेट दिली असता या ग्रामीण रुग्णालयामध्ये एकही कर्मचारी उपस्थित नव्हता. त्यावेळी ना. तनपुरे यांनी आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांकडे या ग्रामीण रुग्णालयातील कर्मचार्‍यांची चौकशी करण्याचे आदेश दिले असल्याची चर्चा सध्या वांबोरी (Vambori) परिसरामध्ये चालू आहे.

- Advertisement -

विशेष म्हणजे राहुरी तालुक्यामध्ये सर्वात मोठा दवाखाना म्हणून वांबोरी येथे ग्रामीण रुग्णालयाकडे पाहिले जाते. परंतु त्या ठिकाणी आरोग्य सेवा उपलब्ध होत नसल्यामुळे हा दवाखाना पूर्णपणे बदनाम झाला आहे. अनेकवेळा अधिकारी नसतात तर कर्मचारी अरेरावीची भाषा वापरतात. असे अनेक प्रकार या रुग्णालयांमध्ये घडले आहेत. कुठलीही घटना घडली तर माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी या आरोग्य केंद्राकडे वेळोवेळी दखल घेतली आहे. त्यानंतर ना. तनपुरे यांनीही या दवाखान्याच्या सुधारणा होण्यासाठी वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत. परंतु या ठिकाणी अधिकारी व कर्मचार्‍यांनी त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविली आहे. असे असताना प्रा. श्याम पटारे यांनी येथे आठ दिवसात या दवाखान्याची सुधारणा झाली नाही तर दवाखान्याला कुलूप ठोकून माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या हस्ते या कुलपाच्या चाव्या आरोग्य मंत्र्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहे, असा इशारा दिला आहे.

वांबोरी ग्रामीण रुग्णालय जवळपास तीस वर्षापासून कार्यरत आहे. आज मात्र या रुग्णालयात असुविधेचा कहर झाला आहे. येथे रात्रपाळीला वैद्यकीय अधिकारी थांबत नाही. रूग्णवाहिका धूळ खात पडली आहे. पूर्वी काहीवेळा तालुक्याचे ज्येष्ठनेते अ‍ॅड. सुभाष पाटील यांनी लक्ष घालून सुधारणा केली होती. मात्र ती जास्त काळ टिकू शकली नाही.

रुग्णालयात एक्स-रे मशीन आहे. मात्र, त्यासाठी ऑपरेटरच नाही. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया कायमची बंद आहे. नेमणुकीवर असलेले डॉक्टर रुग्णालयात थांबत नाहीत. आरोग्य सुविधांचा याठिकाणी पुरता बोजवारा वाजला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या