Wednesday, January 7, 2026
HomeनगरOnion Rate : वांबोरीतील गावरान व लाल कांद्याचा वाचा भाव

Onion Rate : वांबोरीतील गावरान व लाल कांद्याचा वाचा भाव

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

शनिवार दि. 6 डिसेंबर रोजी वांबोरी उपबाजारात (Vambori Sub Market) झालेल्या कांदा लिलावात एकूण 8 हजार 334 कांदा गोण्याची (Onion) आवक झाली. यामध्ये गावरान कांदा 7 हजार 499 तर लाल कांदा 835 कांदा (Onion) गोण्यांचा समावेश होता. गावरान कांदा एक नंबर 1 हजार 305 रुपये ते 1 हजार 800 रुपये, दोन नंबर 905 रुपये ते 1 हजार 300 रुपये तर तीन नंबरचा कांदा (Onion) 100 रुपये ते 900 रुपये भावाने विकला गेला. तसेच गोल्टी कांद्याला 400 रुपये ते 1000 रुपये भाव मिळाला. अपवादात्मक 11 कांदा गोण्यांना 2 हजार 200 रुपये, 8 कांदा गोण्यांना 2 हजार 100 रुपये, 45 कांदा (Onion) गोण्यांना 2000 रुपये तर 53 कांदा गोण्यांना 1 हजार 900 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

तसेच एक नंबरचा लाल कांदा 1 हजार 305 रुपये ते 1 हजार 800 रुपये, दोन नंबरचा कांदा 905 रुपये ते 1 हजार 300 रुपये तर तीन नंबरचा कांदा 100 रुपये ते 900 रुपये विकला गेला. तसेच गोल्टी कांद्याला (Onion) 400 रुपये ते 800 रुपये भाव मिळाला. अपवादात्मक 22 कांदा (Onion) गोण्यांना 2 हजार 200 रुपये भाव मिळाला. भुसार मालात ज्वारी 2 हजार 921 रूपये, बाजरी 1 हजार 726 रुपये, गहु 2 हजार 276 रुपये ते 2 हजार 655 रुपये, मका 1 हजार 550 रुपये ते 1 हजार 740 रुपये, उडीद 4 हजार 801 रुपये तर सोयाबीन (Soybeans) 4 हजार 300 रुपये ते 4 हजार 350 रुपये याप्रमाणे भाव मिळाले.

YouTube video player

ताज्या बातम्या

AMC Election : पैसे वाटपाचा संशय, विनानंबर दुचाकीतून लाखाची रोकड पकडली

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना पैसे वाटप केले जात असल्याच्या संशयावरून एका पक्षाच्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी दोन दुचाकी अडवून त्या तोफखाना पोलिसांच्या ताब्यात दिल्या....