Friday, May 3, 2024
Homeनगरवांबोरीत तरुणाला मारहाण

वांबोरीत तरुणाला मारहाण

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

तुला किती फोन केले, तू फोन उचलले का नाहीस? जादा शहाणा झाला आहेस का? असे म्हणून तिघाजणांनी मिळून मुजफ्फर शेख या या फोटोग्राफर तरुणाला घरात घुसून लाकडी दांडा, काठी व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना दि. 24 जुलै रोजी राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे घडली आहे.

- Advertisement -

मुजफ्फर फारूक शेख, रा. वांबोरी, ता. राहुरी या तरूणाने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले, दि. 24 जुलै रोजी रात्री साडेआठ वाजे दरम्यान मी घरी जात असताना आरोपींनी मला वांड-वांबोरी परिसरातील केएसबी कंपनीच्या पाठीमागील रस्त्यावर आवाज देऊन थांबविले. आरोपीने माझ्या हातातील मोबाईल घेऊन रस्त्यावर फेकून म्हणाले, मी तुला किती फोन केले. तू फोन उचलले का नाहीस? जादा शहाणा झाला आहेस का? असे म्हणून आरोपींनी त्याला लाकडी दांडा, काठी व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

त्यानंतर शेख हा त्याच्या घरी गेल्यानंतर साडेनऊ वाजेच्या सुमारास आरोपी त्याच्या घरात घुसले. तुला बाहेर मारलेला मार खूप कमी आहे. असे म्हणून पुन्हा मारहाण केली. यावेळी मुजफ्फर याचे आई वडील मध्ये आले असता त्यांना देखील मारहाण करण्यात आली. तुम्ही आमच्या विरोधात पोलिसात तक्रार केल्यास तुम्हाला कोणालाही जिवंत सोडणार नाही. अशी आरोपींनी धमकी दिली.

शेख याच्या फिर्यादीवरून आरोपी उमेश मच्छिंद्र कुसमूडे, अजिंक्य मनोज माने, सुरज दिलीप कुसमूडे सर्व रा. वांबोरी, ता. राहुरी या तिघांवर गुन्हा रजि. नं. 705/2022 भादंवि. कलम 324, 452, 323, 504, 506, 427 प्रमाणे जबरदस्ती घरात घुसून मारहाण केल्याचा तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार साईनाथ टेमकर करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या