Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशPM मोदी आज नऊ वंदे भारत ट्रेन्सना दाखवणार हिरवा झेंडा, कोणत्या राज्यांना...

PM मोदी आज नऊ वंदे भारत ट्रेन्सना दाखवणार हिरवा झेंडा, कोणत्या राज्यांना होणार फायदा? वाचा सविस्तर

दिल्ली | Delhi

देशात वंदे भारतने (Vande Bharat Train ) रेल्वेला गतिमान केले आहे. भारतीय रेल्वेचा चेहरामोहरा बदलण्याचे प्रयत्न सुरु आहेत. वंदे भारत रेल्वेवर प्रवाशी फिदा आहेत. अनेक राज्यांनी वंदे भारतची मागणी केली आहे. महाराष्ट्रातही वंदे भारत लोकप्रिय झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज (24 सप्टेंबर) रोजी ९ नवीन वंदे भारत रेल्वेला हिरवा झेंडा दाखवतील. राजस्थान, तमिळनाडू, तेलंगण, आंध्र प्रदेश, कर्नाटक, बिहार, पश्चिम बंगाल, केरळ, ओदिशा, झारखंड आणि गुजरातमधील स्थळांचा यात समावेश आहे.

- Advertisement -

या आहेत 9 नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्या

1- उदयपूर- जयपूर वंदे भारत एक्सप्रेस

2- तिरुनेलवेली-मदुराई-चेन्नई वंदे भारत एक्सप्रेस

3- हैदराबाद-बेंगळुरू वंदे भारत एक्सप्रेस

4- विजयवाडा-चेन्नई (रेनिगुंटा मार्गे) वंदे भारत एक्सप्रेस

5- पाटणा-हावडा वंदे भारत एक्सप्रेस

6- कासारगोड-तिरुवनंतपुरम वंदे भारत एक्सप्रेस

7- राउरकेला-भुवनेश्वर-पुरी वंदे भारत एक्सप्रेस

8- रांची-हावडा वंदे भारत एक्सप्रेस

9- जामनगर-अहमदाबाद वंदे भारत एक्सप्रेस

वेळेची बचत

या वंदे भारत गाड्या त्यांच्या संचालन मार्गावर सर्वात जलद गतीने धावतील आणि प्रवाशांचा बराच वेळ वाचतील. या मार्गावरील सध्याच्या सर्वात वेगवान ट्रेनच्या तुलनेत, राउरकेला-भुवनेश्वर-पुरी वंदे भारत एक्सप्रेस आणि कासारगोड-तिरुवनंतपुरम वंदे भारत एक्सप्रेस अंदाजे तीन तास वेगाने प्रवास करेल. हैदराबाद-बेंगळुरू वंदे भारत एक्स्प्रेस अडीच तासांपेक्षा जास्त वेळ वाचवेल. तर तिरुनेलवेली-मदुराई-चेन्नई वंदे भारत एक्सप्रेस 2 तासांपेक्षा जास्त वेळ वाचवेल. याशिवाय रांची-हावडा वंदे भारत एक्स्प्रेस, पाटणा-हावडा वंदे भारत एक्स्प्रेस आणि जामनगर-अहमदाबाद वंदे भारत एक्स्प्रेसचा सुमारे एक तासाचा वेळ वाचेल आणि उदयपूर-जयपूर वंदे भारत एक्स्प्रेस सुमारे अर्धा तास वेगाने प्रवास करेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या