Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रवसंत मोरेंचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश; उद्धव ठाकरे म्हणाले, "पाच आमदार..."

वसंत मोरेंचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश; उद्धव ठाकरे म्हणाले, “पाच आमदार…”

मुंबई | Mumbai

मनसेचे (MNS) माजी नगरसेवक आणि लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) पुणे लोकसभा (Pune Loksabha) मतदारसंघातून वंचित बहूजन आघाडीची उमेदवारी केलेले वसंत मोरे यांनी आज ठाकरेंच्या शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला आहे. वसंत मोरे (Vasant More) यांनी आपल्या लाखो समर्थकांसह मातोश्रीवर येत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते शिवबंधन बांधून पक्षप्रवेश केला.त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे ठाकरेंचा पुण्यातील गड आणखी मजबूत झाला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : अजित पवार आमदारांसह सिद्धिविनायकाच्या चरणी; फोडला विधानसभा प्रचाराचा नारळ

यावेळी बोलतांना वसंत मोरे म्हणाले की, “प्रथम मी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांना वंदन करतो. १९९२ साली पहिल्यांदाच कात्रजमध्ये शिवसेना शाखाप्रमुख झालो. माझ्या १६ व्या वर्षी शिवसेनेची शाखा झाली होती. पण १८ वर्षे पूर्ण नसल्याने शाखाध्यक्ष होऊ शकलो नव्हतो. परंतु, बारावी पास झालो आणि शाखाप्रमुख झालो. वयाच्या ३१ व्या वर्षांपर्यंत मी उपविभागप्रमुखापर्यंत पोहोचलो. नंतर मनसेत प्रवेश केला. मला अनेकजण म्हणतात की शिवसेनेत माझा प्रवेश आहे. परंतु, माझा प्रवेश नाही तर मी पुन्हा शिवसेनेत आलो आहे, असे त्यांनी म्हटले.

हे देखील वाचा : मिहिर शहा गुवाहाटीला पळाला की सुरतला?; वरळी अपघातावरुन राऊतांचा हल्लाबोल

तसेच पुढे ते म्हणाले की, “आगामी पुणे महापालिका (Pune NMC) निवडणुकीत २५ पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणण्याची ताकद उभी करू. १७ शाखाध्यक्ष, ५ उपविभाग अध्यक्ष १ शहारध्यक्ष, दोन सचिव आणि महिला आघाडीच्या पाच शाखाध्यक्ष यांच्या सर्वांसह मी शिवसेनेत प्रवेश करत आहेत. १२ मार्च रोजी मी मनसेचा राजीनामा दिला तेव्हाच यांनीही पक्षाचा राजीनामा दिला होता, असेही वसंत मोरे यांनी सांगितले.

हे देखील वाचा : Nashik Police Recruitment : प्रश्न आणि उत्तरांच्या पर्यायात संदिग्धता

शिवसेनेचे पाच आमदार निवडून आणा

दरम्यान, यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वंसत मोरे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत केले. त्यानंतर त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. ते म्हणाले की, आम्ही सर्व पाहत होतो की लोकसभा निवडणुकीआधी वसंतराव काय करत आहेत. काय करायचं हा ज्याच्या त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो. तुम्ही शिवसैनिक होतात. मधल्या काळात तुम्ही दिशा चुकलात होतात असं मी म्हणणार नाही. पण इतर पक्षातील अनुभव घेऊन तुम्ही स्वगृही परतला आहात. तुमची जबाबदारी फार मोठी आहे. तुमच्या हाती शिवबंधन बांधत असताना अनेकजण म्हणाले की आम्हीही शिवसैनिक होतो. त्यामुळे तुम्हाला शिक्षा झाली पाहिजे. शिक्षा हीच आहे की पूर्वीपेक्षा कित्येक पटीने पुण्यात शिवसेना वाढवून पाहिजे. शिक्षा हा फार गंमतीचा शब्द आहे. ही जबाबदारी आहे. लोकसभा निवडणुकीने देशाला दिशा दाखवली आहे. लोकशाही धोक्यात आणली होती. लोकशहातीतील गद्दारी खोकेबाजी आणि महाराष्ट्राच्या अस्तित्त्वाची लढाई होणार आहे. पुणे हे उद्याच्या सत्ताबदलाचं केंद्र असलं पाहिजे. सत्ताबदलाचा पाया, खडकवासल्यातील खडक पुण्यातून सुरुवात झाली पाहिजे. आता मी शिवसेनेचा मेळावा घ्यायला येणार. सर्वांसमोर सर्वांच्या भेटीला यायचं आहे. शिवसेनेचे पाच आमदार होते पुण्यात, ते मला पुन्हा निवडून आणायचे आहेत, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले.

व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या