Friday, May 3, 2024
Homeनाशिकवसुबारस पारंपारिक पद्धतीने साजरी

वसुबारस पारंपारिक पद्धतीने साजरी

पळसन । धर्मराज महाले Palsan

दिपावलीच्या सणास आज वसुबारसने सुरुवात झाली. आदिवासी भागात महिलानी पारंपारिक पद्धतीने गाय – वासरू यांची पुजा केली.आदिवासी भागात निसर्गाची पूजा हा खरा धर्म मानला जात आहे.

- Advertisement -

वाघदेव हे त्याचे उत्तम प्रतीक आहे. ज्या शक्तीचे पभावामुळे हिस्ञ श्रापदापासुन त्यचे त्याच्या गायी – जनावराचे संरक्षण होते हीच शक्ती वाघ्यात आहे, असे मानले जाते. एक महिन्यापासून आदिवासीचे सर्व देव रानात पारधीला गेलेले असतात व ते याच दिवशी परत येतात , असे जाणकाराचे म्हणणे आहे, या दिवसाला आदिवासी लोकांच्या जीवणात वेगळेच महत्व आहे.

वाघाचे देवस्थाने प्रत्येक गावात गावच्या शिव असते तेथे असतात ,वसुबारसेनिमित्त लोक शेतातील कामे पूर्णपणे बंद ठेवतात,गुराखी ही वसुबारस आनंदाने साजरी करतात, सकाळी शिवेवर किंवा वाघदेवतेच्या स्थानजवळ जाऊन कोंबड्या आणी बोकडाचा मटनाचा नैवेद्य देतात, लहान मुले गावातच जातात,यात एका मुलांच्या डोक्यावर बांबुपासुन बनवलेली एक टोपली असते,या टोपलीला कमान करून झेडुच्या फुलांनी सजविले जाते,

गावात गेल्यावर प्रत्येक घरासमोर जाऊन वाघदेवतेच्या नावाने आनंदाने गित गातात,प्रत्येक घरासमोर वाघ्याची भायरो दुधभात खायरो,ताब्याला कासरा घरी दोन वासरा,दिवाळी दसरा भाजीपाला विसरा , अशी गाणी म्हणुन धान्य व नागलीचे पिठ , दुध,पैसे, या प्रमाणे गोळा करून नदीला किवा जंगलात जाऊन वनभोजन (स्वयंपाक)करतात .सायंकाळी महिलातफे ठिकठिकाणी गाय – वासरू, वसुची पुजा केली जाते. संध्याकाळी पाच ते सहा वाजे दरम्यात गुरखी जंगलातून गायी घरी येताना गावात घुसण्या अगोदर एकाच ठिकाणी सर्व गायीची पंटागणात गावातील जाणकार पुजा करतात व निवद खाऊ घालतात, तसेच वसुला भाकरीचा नैवेद्य खाऊ खालतात.

[वाघाची मूर्ती दगडावर किवा लाकडाच्या ओडक्यावर कोरलेली असते,तीच आदिवासी जनतेची कुलदैवत म्हणजेच वाघदेवता.या दैवताचा उत्सव पौष महिन्याच्या शुद्ध आणी वैद्य १२ व्या दिवशी म्हणजेच बारशीच्या दिवशी साजरा केला जातो.यालाच वाघबारस म्हणतात. ]

- Advertisment -

ताज्या बातम्या