Wednesday, October 16, 2024
Homeमुख्य बातम्या...अन्यथा आम्ही लोकसभेच्या ४८ जागा लढवू; वंचितचा काँग्रेसला इशारा

…अन्यथा आम्ही लोकसभेच्या ४८ जागा लढवू; वंचितचा काँग्रेसला इशारा

मुंबई | Mumbai

शिवसेना ठाकरे गटासोबत आघाडी केल्यानंतर सुद्धा वंचित आघाडीला (VBA Alliance With Shivsena Thackeray Group) अजूनही इंडिया आघाडीमध्ये (India Alliance) स्थान नाहीये. काँग्रेसने (No Response From Congress) याबद्दल अजूनही कोणतीही घोषणा केलेली नाही. त्यामुळे काँग्रेसला वंचितसोबत आघाडी करण्यात रस आहे का? असा थेट सवालच वंचित आघाडीने विचारला आहे. जर ७ दिवसांत उत्तर दिले नाही तर वंचित आघाडी सर्व ४८ जागांवर निवडणूक लढवणार, असा इशारा वंचित आघाडीकडून देण्यात आला आहे.

- Advertisement -

वंचितने १ सप्टेंबर रोजी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Congress Chief Mallikarjun Kharge) यांना पत्र पाठवले होते. परंतु काँग्रेसकडून अद्याप यावर कुठलेही ठोस उत्तर आले नाही त्यामुळे संतापलेल्या वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला ७ दिवसांची मुदत दिली आहे.

वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला आघाडी करण्यात रस आहे का? असा प्रश्न करत खरगेंना पाठवलेल्या पत्राची आठवण करून दिली आहे. त्याचसोबत काँग्रेसने ७ दिवसात उत्तर द्यावे अन्यथा लोकसभेतील सर्व ४८ जागांवर निवडणूक लढवू असं त्यांनी म्हटलं आहे. INC आणि त्यांचे सहयोगी तिसऱ्या INDIA बैठकीसाठी मुंबईत होते. त्यावेळी बैठकीला का बोलावले नाही, अशी विचारणा करण्यात आली होती. पण मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडून कोणताच प्रतिसाद आलेला नाही.

Chandrashekhar Bawankule : “आपल्या विरोधात बातम्या येऊ म्हणून पत्रकारांना…”; बावनकुळेंचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला

वंचित बहुजन आघाडीला हे जाणून घ्यायचे आहे की आम्हाला कधीतरी उत्तर मिळणार आहे का. मिळणार नसेल तर काँग्रेसने महाराष्ट्रातील जनतेला समजावून सांगावे की, काँग्रेसला वंचित आणि बहुजनांना आघाडीत सहभागी का करून घ्यायचे नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आणि २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ६.९८ आणि ५.५७ टक्के मते मिळविणाऱ्या पक्षाला आघाडीचे आमंत्रण का पाठवले गेले नाही किंवा सामील केले गेले नाही याचे स्पष्टीकरण त्यांनी द्यावे. २०१९ पासून ज्या पक्षाची लोकप्रियता आणि मतदारांची संख्या वाढली आहे तो पक्ष युतीत का नाही याचे स्पष्टीकरण दिले पाहिजे.

जर INDIA आघाडी भाजप-आरएसएसच्या फुटीरवादी विचारसरणी आणि राजकारणाशी लढण्यास खरोखरच गंभीर असेल, तर प्रत्येक धर्मनिरपेक्ष आणि समविचारी पक्षांना सहभागी करून घेणे काँग्रेसचे कर्तव्य आहे. परत एकदा सांगतो, आमचे दरवाजे खुले आहेत” असे तेलंग यांनी लिहिलेल्या ई-मेलच्या समारोपाच्या परिच्छेदात म्हटले होते असे वंचित आघाडीकडून स्पष्ट करण्यात आले.

भाजपा पदाधिकाऱ्यांना दिलेल्या ‘त्या’ अजब सल्ल्यावर चंद्रशेखर बावनकुळेंचं स्पष्टीकरण, म्हणाले…

जर काँग्रेसला आमच्या ई-मेलला उत्तर द्यायचे असेल आणि VBA सह युती करायची असेल तर ते पुढील ७ दिवसांत उत्तर देऊ शकतात. अन्यथा, आम्ही सर्व ४८ जागा लढवण्याच्या आमच्या योजनेनुसार पुढे जाऊ, कारण आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही सर्व ४८ जागांसाठी उमेदवार निश्चित करण्याच्या मार्गावर आहोत, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे यांनी दिला आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या