शिरवाडे वणी | वार्ताहर Shirvade Vani
मुंबई-आग्रा महामार्गावर Mumbai- Aagra Highway शिरवाडे पिंपळगाव Shirvade Pimpalgaon दरम्यान सूर्या हॉटेल समोर काळी पिवळी व कार यांच्या जोरदार धडकेत झालेल्या अपघातामध्ये Accident पाच जण गंभीर जखमी झाले असून पिंपळगाव बसवंत येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहे.
अपघाताचे सविस्तर वृत्त असे की मुंबई-आग्रा महामार्गावर शिरवाडे पिंपळगाव दरम्यान सूर्या हॉटेल समोर चांदवड कडून नाशिक कडे रविवारी सायंकाळी पाच वाजून 35 मिनिटांनी एम एच -15 -21 07 या क्रमांकाची महिंद्रा कंपनीची काळीपिवळी प्रवासी वाहतूक करणारी गाडी व त्याच दिशेने एम -एच- 41- 31 13 या क्रमांकाची फोर व्हीलर कार जात असताना दोन्ही वाहनांच्या जोरदार धडकेमध्ये पाच जण अतिशय गंभीर जखमी झाले आहेत.
दोन वाहनांच्या भीषण अपघातामध्ये सय्यद इम्रान इरफान राहणार नाशिक मीना दादाजी अहिरे ,मनमाड कल्पना सुरेश अहिरे. कूपखेडा आदित्य उमेश भाबड व चेतना उमेश भाबड दोघे राहणार महालक्ष्मी नगर नाशिक असे एकूण पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
या घटनेची माहिती मिळताच शिरवाडे वणी चौफुली वरील नरेंद्र महाराज संस्थान अंतर्गत 24 तास विनामूल्य सेवा कार्यरत असलेली रुग्णवाहिका चालक मधुकर गवळी यांनी तातडीने घटनास्थळी येऊन जखमींना पिंपळगाव बसवंत येथील राधाकृष्ण हॉस्पिटल या खाजगी रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत रुग्णवाहिका वेळेवर आल्यामुळे जखमींचे प्राण वाचले असल्याची माहिती जखमींच्या नातेवाइकांनी दिली आहे पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यामध्ये अपघाताची नोंद करण्यात आली आहे.