Sunday, May 19, 2024
Homeधुळेवर्डीचा ग्रामविकास अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

वर्डीचा ग्रामविकास अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

धुळे / चोपडा । Dhule / Chopda । प्रतिनिधी

खाजगी बांधकाम ठेकेदाराकडून (private construction contractor) 11 हजारांची लाच (Bribe) घेणार्‍या वर्डी (ता. चोपडा) ग्रामपंचायतीच्या (Gram Panchayat) ग्रामविकास अधिकार्‍याला (Village Development Officer) रंगेहात पकडण्यात (Caught in the act) आले. धुळे एसीबीच्या पथकाने (ACB squads) ही आज दुपारी ही कारवाई केली. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

खर्डी (ता.चोपडा, जि. जळगाव) येथील खाजगी बांधकाम ठेकेदाराच्या (private construction contractor) तक्रारीनुसार, वर्डी ग्रामपंचायत येथील पंधराव्या वित्त आयोगातंर्गत निधीतुन गटार व ढापे बांधकामाचे काम जळगाव येथील एका शासकीय ठेकेदाराने (contractor)) दि. 31 डिसेंबर 2021 च्या ई निविदा प्रकीयेव्दारे घेतले होते. ते काम तक्रारदाराने त्यांच्याकडुन कामाचा सब ठेका शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर दि.11 फेब्रुवारी 2022 रोजी सब कॉन्टॅक्टर करारनामा करुन घेतले होते.

करारनामाप्रमाणे तक्रारदार ठेकेदाराने सब ठेका घेतलेले काम पुर्ण केले. झालेल्या कामाचे बिल शासकीय ठेकेदाराच्या नावे अदा होण्यासाठी तक्रारदार यांनी ग्रामविकास अधिकारी (Village Development Officer) भगवान पांडुरंग यहिदे (वय 58) यांची भेट घेतली. तेव्हा त्यांनी कडे 5 टक्याप्रमाणे 12 हजार 500 रुपये लाचेची मागणी केली होती.

तक्रारदार यांना लाच (Bribe) देण्याची ईच्छा नसल्याने त्यांनी धुळे अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो कार्यालयाकडे दुरध्वनीव्दारे माहिती दिली होती. त्यावरुन धुळे एसीबीच्या पथकाने चोपडा येथे जावुन तक्रारदाराची भेट घेवुन त्यांची तकार नोंदवुन घेतली. आज तक्रारीच्या पडताळणी दरम्यान ग्रामविकास अधिकारी भगवान यहीदे यांनी तक्रारदाराकडे कामाचे बिल अदा करण्यासाठी 12 हजार 500 रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती 11 हजार रुपये लाच (Bribe) स्विकारतांना त्यांना रंगेहात पकडण्यात आले.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण तसेच राजन कदम, शरद काटके, संतोष पावरा, पोकॉ मोरे, सुधीर मोरे यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या