Wednesday, May 8, 2024
HomeमनोरंजनSameer Khakhar : ‘नुक्कड’ फेम अभिनेते समीर खक्कर यांचं निधन

Sameer Khakhar : ‘नुक्कड’ फेम अभिनेते समीर खक्कर यांचं निधन

मुंबई | Mumbai

दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या ‘नुक्कड’ या लोकप्रिय मालिकेत ‘खोपडी’ ही व्यक्तिरेखा साकारून घराघरांत प्रसिद्ध झालेले अभिनेते समीर खक्कर यांचे आज (१५ मार्च) निधन झाले. समीर यांनी मुंबईच्या (Mumbai) पश्चिम उपनगरातील बोरिवली (Borivali) इथल्या राहत्या घरी वयाच्या ७१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

- Advertisement -

श्रीगोंद्यातील अरणगाव दुमाला येथे सशस्त्र दरोडा, हल्ल्यात एकाचा मृत्यू

‘पुष्पक’, ‘शहेनशाह’, ‘रखवाला’, ‘दिलवाले’, ‘राजा बाबू’यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये समीर खक्कर झळकले आहेत. मात्र, १९९६मध्ये त्यांनी अभिनय कारकिर्दीला राम राम ठोकून अमेरिकेत जाण्याचा निर्णय घेतला होता. अमेरिकेत ते जावा कोडर म्हणून नोकरी करत होते. अमेरिकेत काम करत असताना समीर आनंदी होते, पण २००८ मध्ये तिथल्या मंदीनंतर त्यांची नोकरी गेली.

हद्दच झाली राव!! गोडाऊन फोडून ४५ खाद्य तेलाच्या डब्ब्यांसह कुत्र्याच्या पिल्लाचीही चोरी

समीर यांनी ‘नुक्कड’ या मालिकेतून अभिनयाच्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर ते दूरदर्शनच्या ‘सर्कस’ या मालिकेत चिंतामणीची भूमिका साकारताना दिसले. समीर यांनी डीडी मेट्रोच्या ‘श्रीमान श्रीमती’ या मालिकेत चित्रपट दिग्दर्शक टोटोची भूमिकाही साकारली होती.

बोअरवेलमध्ये पडलेल्या ‘त्या’ चिमुकल्याचा अखेर मृत्यू

याशिवाय ‘संजीवनी’ या मालिकेतही त्यांनी गुड्डू माथूरची भूमिका साकारली होती. याशिवाय ‘हसी तो फसी’, ‘जय हो’, ‘पटेल की पंजाबी शादी’ यांसारख्या चित्रपटात काम केले. समीर खाखर झी ५ च्या सनफ्लॉवर वेब सीरिजमध्येही दिसले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या