Wednesday, August 26, 2026
Homeब्रेकिंग न्यूजज्येष्ठ दिग्दर्शक कुकू कोहली यांचे निधन

ज्येष्ठ दिग्दर्शक कुकू कोहली यांचे निधन

मुंबई : वृत्तसंस्था

- Advertisement -

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शक आणि निर्माते कुकू कोहली यांचे मंगळवारी (२५ ऑगस्ट) मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. अभिनेता अजय देवगणला ‘फूल और कांटे’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत लॉन्च करण्याचे श्रेय कुकू कोहली यांना जाते.

कुकू कोहली यांना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती त्यांचे जवळचे मित्र आणि चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी दिली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांच्या उपचारादरम्यान स्टेंटही बसवला होता. मात्र, मंगळवारी त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही त्यांना वाचवता आले नाही.

कुकू कोहली यांच्या दिग्दर्शनातील ‘फूल और कांटे’ हा चित्रपट १९९१ मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटातून अजय देवगणने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. चित्रपटातील अजय देवगणची दमदार एन्ट्री आणि त्याची अभिनयशैली प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली. या चित्रपटाने अजय देवगणच्या दीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीची पायाभरणी केली.

कुकू कोहली यांनी आपल्या कारकिर्दीत ‘सुहाग’, ‘हकीकत’, ‘जुल्मी’, ‘अनारी नंबर १’, ‘ये दिल आशिकाना’ आणि ‘वो तेरा नाम था’ यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले. हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक दशकांच्या त्यांच्या योगदानामुळे त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली होती.

ताज्या बातम्या

Crime News : धारदार हत्यारे घेऊन दहशत करणारे दोघे जेरबंद; दोन...

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar हातात धारदार कोयता, कत्ती आणि चाकू घेऊन नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणार्‍या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्यासोबत असलेल्या दोन अल्पवयीन मुलांनाही पोलिसांनी...