Monday, September 28, 2026
Homeक्राईमJamkhed : 51 लाखांचा गुटखा पोलिसांच्या जाळ्यात

Jamkhed : 51 लाखांचा गुटखा पोलिसांच्या जाळ्यात

टेम्पोसह मुद्देमाल ताब्यात, तिघांवर गुन्हा

जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed

खर्डा पोलिसांनी प्रतिबंधित गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ व सुगंधी सुपारीसह आयशर टेम्पो असा 51 लाख 41 हजार 48 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. चालकाने पोलिसांचा थांबण्याचा इशारा धुडकावून टेम्पो पळविल्याने पोलिसांनी पाठलाग करून तेलंगशी गावच्या शिवारात वाहन ताब्यात घेतले. 24 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास खर्डा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक उज्ज्वलसिंह राजपूत यांना गुप्त माहिती मिळाली.
त्यानूसार, धाराशिवकडून बीडकडे शिर्डी-हैदराबाद राज्य महामार्गावरून गुटख्याची वाहतूक होणार असल्याने जातेगाव फाटा येथे नाकाबंदी करण्यात आली. संशयित टेम्पो दिसताच पोलिसांनी चालकाला थांबण्याचा इशारा केला; मात्र त्याने वाहन भरधाव वेगाने पळविले. पाठलाग करून टेम्पो ताब्यात घेतल्यानंतर झडतीत 41 लाख 41 हजार 48 रुपयांचा गुटखा व सुगंधी सुपारी आणि सुमारे 10 लाख रुपयांचा टेम्पो असा 51 लाख 41 हजार 48 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

- Advertisement -

या प्रकरणी राजू मेहबूब शेख (भेंडटाकळी, ता. गेवराई, जि. बीड), प्रदीप विष्णू गायकवाड (च-हाटा फाटा, ता. जि. बीड) आणि तुषार नामदेव कुसळकर (बीड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस कॉन्स्टेबल शशिकांत म्हस्के यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक उज्ज्वलसिंह राजपूत, पोलीस उपनिरीक्षक अशोक खेडकर, पोलीस हवालदार संभाजी शेंडगे, गोकुळ इंगवले, रावसाहेब नागरगोजे, शशिकांत म्हस्के, वैजनाथ मिसाळ, बाळू खाडे, आनंद धनवडे, विष्णू आवारे, अशोक बडे, राहुल खेडकर तसेच होमगार्ड तान्हाजी जायभाय, महादेव कदम, राहुल भिसे यांनी केली.

ताज्या बातम्या

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला मिळाला सर्वाधिक भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata रविवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांदा आवक वाढली. कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक 4800 रुपयांपर्यंत भाव मिळाला. कांद्याची 2558 गोण्यांची...