Thursday, May 2, 2024
Homeनगरपशूवैद्यकीय दवाखान्यांत बसविलेल्या सोलर युनिटची होणार चौकशी

पशूवैद्यकीय दवाखान्यांत बसविलेल्या सोलर युनिटची होणार चौकशी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मागील वर्षी जिल्हा परिषद प्रशासनाने जिल्ह्यातील पशू वैद्यकीय दवाखान्यांत सोलर युनिट बसविण्याचा निर्णय घेतला होता.

- Advertisement -

त्यानूसार जिल्ह्यातील 77 पशूवैद्यकीय दवाखान्यांत सोलर युनिट बसविण्यात आले. मात्र, या ठिकाणी नेट मीटरसाठी बसविण्यासाठी प्रत्येकी 45 हजार रुपये जादा देवूनही हे नेट मिटर बसविण्यात आले नाही आणि संबंधीत ठेकेदाराला बिल अदा करण्यात आले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधीत अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी पूशसंवर्धन विभागाचे सभापती सुनील गडाख यांनी केली आहे.

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना त्याबाबत पत्र दिले आहे. जिल्हा परिषदेच्या पशूसंवर्धन विभागाच्या दवाखान्यांत सोलर युनिट बसविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येवून योजना राबविण्यात आली. मात्र, योजना राबवितांना आणि सोलर युनिट बसवितांना त्या ठिकाणी 45 हजार रुपये अतिरिक्त देवूनही सोलर नेट मीटर बसविण्याची तरतूद असतांना ते नेट मीटर बसविण्यात आले नाही.

यासंदर्भात सभापती गडाख यांनी गत आठवड्यात झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत तक्रार केली होती. जिल्ह्यात 77 पशूसंवर्धन विभागचे दवाखाने आहेत. त्या ठिकाणी सोलर युनिट बसविण्यात आलेले आहेत. हे युनिट बसवितांना त्या ठिकाणी स्वतंत्र नेट बसविणे गरजेचे होते.

त्यासाठी 45 हजार रुपये प्रत्येकी जादा अदा करण्यात आलेले आहेत. असे असतांना ते नेट न बसविता संबंधीत ठेकेदाराला विद्यूत विभागाने बिल अदा केलेले आहे. विशेष म्हणजे या कामाची बांधकाम विभाग आणि विद्यूत विभागाने एमबी तयार केली असून ठेकेदारांना बील अदा करण्यात आले आहे. या घोटाळ्यातील तीन ठेकेदार असून यात आणखी कोणाकोणाचा यात संबंधत आहे, याची चौकशी करण्याची मागणी सभापती गडाख यांनी केली आहे.

यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र दिले असून प्रशासन काय भूमिका घेणार याकडे लक्ष असल्याचे सभापती गडाख यांनी ‘सार्वमत’शी बोलतांना सांगितले.

सर्वसाधारण सभेत विषय गाजणार
येत्या 9 नोव्हेंबरला जिल्हा परिषदेची ऑनलाईन सर्वसाधारण सभा होणार आहे. या सभेत हा विषय चांगलाच गाजणार असल्याची चिन्हे आहेत. जिल्हा परिषदेत करोना काळात पदाधिकारी यांचे दुर्लक्ष झाल्याने विद्यूत विभागाने हा 35 लाखांचा घोळ घातला आहे. वारंवार मागणी करूनही संबंधीत ठेकेदार यांनी सोलर युनिटला नेट मीटर बसविले नाही. ही बाबत संबंधीत 77 पशूवैद्यकीय दवाखान्यांती डॉक्टर यांच्यामुळे समोर आल्याचे सभापती गडाख यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या