मुंबई | Mumbai
देशाच्या उपराष्ट्रपतीपदासाठी मतदान सुरु असतानाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक सूचक विधान केले आहे. एनडीएकडून महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन तर इंडिया आघाडीकडून सुदर्शन रेड्डी निवडणुकीच्या मैदानात आहेत. संध्याकाळी पाच वाजेदरम्यान मतदान होणार असून मतदानाला चार तास शिल्लक असतानाच फडणवीस यांनी केलेल्या एका विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्यात.
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा सस्पेन्स मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विधानाने वाढला आहे. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर प्रश्न विचारला. खासदार फुटून क्रॉस वोटींग होणार का ? या प्रश्नावर फडणवीसांनी, “आगे आगे देखो होता हैं क्या!” असे उत्तर दिले.
या निवडणुकीत एकूण ७८२ खासदार मतदान करणार असून लोकसभेतील ५४३, राज्यसभेतील २३३ आणि १२ नामनिर्देशित सदस्यांचा समावेश आहे. खासदार गुप्त मतदानाद्वारे उमेदवारांच्या पसंतीच्या क्रमाने मत देतात आणि बहुमत गाठेपर्यंत मतमोजणी प्रक्रिया सुरू राहते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सकाळी १० वाजता मतदान केले. सध्या इंडिया आघाडीच्या उमेदवाराकडे सुमारे ३२३ मतांचे समर्थन असल्याचे सांगिले जाते, तर एनडीएकडे ४३८ मते असल्याचे म्ंहटले जात आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




