Wednesday, January 7, 2026
Homeदेश विदेशVice Presidential Election: उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकी आधी मोठी घडामोड; 'या' दोन पक्षांनी मतदान...

Vice Presidential Election: उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकी आधी मोठी घडामोड; ‘या’ दोन पक्षांनी मतदान न करण्याचा घेतला निर्णय

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिल्याने या महत्वाच्या पदासाठी निवडणूक जाहीर झाली आहे. उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी सत्ताधारी एनडीएकडून महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीकडून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. उपराष्ट्रपति‍पदाची निवडणूक मंगळवारी होणार आहे. या निवडणुकीत संसदेच्या दोन्ही सभागृहातील सदस्य मतदान करतील. संसदेत सध्याचे संख्याबळ आणि राजकीय पक्षांची भूमिका यातून एक दिवस आधीच निकालाचे संकेत मिळत आहेत. मात्र या निवडणुकीत २०१७ च्या उपराष्ट्रपती निवडणुकीत UPA ला आणि २०२२ मध्ये एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा दिलेल्या नवीन पटनाईक यांच्या बिजू जनता दलाने उपराष्ट्रपती निवडणुकीच्या आदल्या दिवशी आपली भुमिका स्पष्ट केली. या दोन्ही पक्षांनी घेतलेल्या निर्णयामुळे आता उद्या होणाऱ्या निवडणुकीत काय परिणाम होतील हे पाहणे महत्वाचे राहणार आहे.

बिजू जनता दलाचे खासदार सस्मित पात्रा यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की बिजू जनता दलाने उद्या होणाऱ्या उपराष्ट्रपती निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. बीजेडी एनडीए आणि इंडिया या दोन्ही आघाड्यांना समान अंतरावर ठेवेल. आमचे लक्ष्य ओडिशा आणि ओडिशाच्या साडे चार कोटी लोकांच्या विकास आणि कल्याणावर केंद्रीत आहे. पात्रा म्हणाले, ‘आमच्या पक्षाचे अध्यक्ष नवीन पटनायक यांनी वरिष्ठ नेत्यांशी आणि राजकीय विषयक समिती, खासदार यांच्याशी चर्चा केल्यानंतर उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय घेतला. बीआरएसचे कार्यकारी अध्यक्ष के.टी. रामा राव यांनी सोमवारी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाग न घेण्याचा निर्णय जाहीर केला.

- Advertisement -

शेतकऱ्यांसाठी युरीयाचा मुद्दा गंभीर बनल्याने बीआरएस नोटा निवडणार
केटी रामा राव यांनी सांगितले की तेलंगणामध्ये युरीयाचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. येथील शेतकऱ्यांसाठी हा गंभीर मुद्दा बनला आहे. याच्या निषेधार्थ आम्ही उपराष्ट्रपती पदाच्या मतदान प्रक्रियेतच सहभागी होणार नाहीये. हा प्रश्न भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना सोडवण्यात अपयश आल्याचा आरोप बीआरएसने केली. बीआरएसने उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत ‘नोटा’चा पर्याय उपलब्ध असेल तर तो आम्ही निवडणार असे सांगितले.

YouTube video player

संख्याबळाचा मुद्दा
सध्या लोकसभेत ५४२ तर राज्यसभेत २३९ खासदार आहेत, म्हणजे एकूण ७८१ खासदार मतदान करतील. या निवडणुकीत विजयासाठी ३९१ खासदारांच्या पाठिंब्याची गरज आहे. त्यातच निवडणुकीच्या एक दिवस आधी ओडिशाचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची बीजेडी आणि तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीने मतदानापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मतदान करणाऱ्या खासदारांची संख्या ७७० इतकी झाली आहे. त्याचा अर्थ विजयी उमेदवाराला जिंकण्यासाठी ३८६ खासदारांच्या पाठिंब्याची गरज आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : “फक्त एक मत मला द्या, उरलेली...

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik आगामी महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) पार्श्वभूमीवर नवीन नाशकात (Nashik) प्रचाराला वेग आला असतानाच, काही इच्छुक उमेदवारांनी (Candidate) निवडलेली...